Search
Close this search box.

कोणी ऐऱ्यागैऱ्याने श्रेय घेऊ नये, ठाण्याला आव्हान देऊ नये; मंत्री भरत गोगावलेंचा जरांगे पाटलांवर पलटवार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सरकारच्या विनंतीला मान देऊन मराठा आरक्षण, जात पडताळणीसंदर्भातील उपोषण मागे घेतलं असून सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर काही आरोप केले जात आहेत. त्यामध्ये, काही ठराविक माणसांना कंत्राट देण्यासाठी जरांगे पाटलांनी सरकारवर दबाव टाकला, जवळच्या माणसांना जलसंपदा विभागातून कंत्राट देण्यात आल्याचा आरोपही काहींनी त्यांच्यावर केला आहे. त्यातच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंवर जरांगे पाटलांनी टीका केली, तसेच आंदोलनातील मराठ्यांना गुंतवण्याचं कामही केल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला. आता, जरांगे पाटलांच्या टीकेवर मंत्री भरत गोगवले यांनी पलटवार केला.

गणेशोत्सव काळात मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावेळी सत्ताधारी आणि जरांगे पाटील यांच्यात वार-पलटवार झाल्याचं पाहायला मिळालं. जरांगे पाटलांनी यावेळी आपल्या आंदोलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर, मंत्री भरत गोगावले आणि प्रताप सरनाईक यांनी पलटवार केला. आता, पुन्हा एकदा  मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा मंत्री भरत गोगावले यांच्याकडून समाचार घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांची शान या पठ्ठ्यानं वाढवली आहे, गरीब मराठ्यांनी वाढवली असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं. जरांगे पाटलांच्या या वक्तव्यावर भरत गोगावलेंनी पलटवार केला.

कोणी ऐऱ्या गैऱ्याने श्रेय घेऊ नये

मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर मंत्री भरत गोगावले यांनी पलटवार केला, एकनाथ शिंदे यांची शान लाखो लाडक्या बहिणी, मराठे आणि शेतकरी यांच्यासाठी केलेल्या कामामुळे वाढली आहे. कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचं श्रेय घेऊ नये आणि ठाण्याला कोणी आव्हान देऊ नये, अशा शब्दात भरत गोगावलेंनी जरांगे पाटलांवर पलटवार केला. तसेच, मराठे म्हणून आम्ही याचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

जरांगे पाटलांविरुद्ध 11 टीम तयार केल्या

दरम्यान, जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून दुरावा आल्याचं दिसून येत आहे. मनोज जरांगे पाटलांनी आंतरवालीत सुरू केलेल्या आंदोलनावेळी मुख्यमंत्र्यांसह एकनाथ शिंदेंवरही जोरदार हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीत आपणच, मराठ्यांनी मदत केल्याचं सांगत त्यांनी सरकारने फसवणूक केल्याचं म्हटलं होतं. तर, जरांगे पाटलांवर टीका करण्यासाठी 11 टीम नेमण्यात आल्या, कॅबिनेटमध्ये एका मंत्र्याने जरांगे पाटलांचं आता ऐकायचं नाही, असं म्हटल्याचा दाखल देत नाव न घेता जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदेंवर टाकी केली.

admin
Author: admin

और पढ़ें