Search
Close this search box.

Ganesh Chaturthi 2026: आज दीड दिवसाचे गणपती विसर्जन! ‘या’ वेळेत विसर्जन टाळावे? विसर्जनाचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत जाणून घ्या…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नुकताच लाडका बाप्पा घरोघरी विराजमान झाला आहे. आता त्याचं स्वागत, लाड सर्व पाहुणचार भाविकांकडून केला जातो. आपण पाहतो गणेशोत्सव कोणाकडे दीड दिवसांचा… कोणाकडे 5 दिवसांचा तर कोणाकडे 10 दिवसांचा असतो. प्रत्येक जणाकडे वेगवेगळी परंपरा असते. त्यापैकी दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे आज विसर्जन केले जाणार आहे. या गणेशोत्सवामागे धार्मिक श्रद्धेबरोबरच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचेही मोठे महत्त्व आहे. घरगुती गणपतीची स्थापना केल्यानंतर दीड दिवसांनी बाप्पाला निरोप देण्याची पद्धत अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यान्‌पिढ्या चालत आली आहे. आज दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन कधी केले जाणार? शुभ मुहूर्त काय? विसर्जनापूर्वी परंपरा काय? पूजा पद्धत, मुहूर्त जाणून घ्या…

दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त 2026 (Ganesh Chaturthi 2026)

वैदिक पंचांगानुसार, यंदा गणेश चतुर्थी सोमवार, 14 सप्टेंबर 2026 रोजी साजरी होत आहे. घरगुती दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन मंगळवार, 15 सप्टेंबर 2026 रोजी केले जाणार आहे. महाराष्ट्रातील पंचांगानुसार 14 सप्टेंबरला गणपतीची स्थापना झाल्यानंतर दीड दिवसांची परंपरा पाळणारे भाविक 15 सप्टेंबरला बाप्पाला निरोप देतील.

दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त 2026

  • पंचांगानुसार मंगळवार, 15 सप्टेंबर 2026 रोजी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाईल.
  • दुपारचा मुहूर्त (लाभ व अमृत चौघडिया): दुपारी 12:17 ते 1:48 पर्यंत.
  • दुपारनंतरचा शुभ मुहूर्त: दुपारी 3:20 ते 4:52 पर्यंत.
  • संध्याकाळचा मुहूर्त (लाभ चौघडिया): संध्याकाळी 7:52 ते रात्री 9:20 पर्यंत.
  • रात्रीचा मुहूर्त: रात्री 10:49 ते पहाटे 3:13 पर्यंत.
  • टीप : शक्यतो राहुकाळात गणपती विसर्जन करणे टाळावे. शहरानुसार पंचांगातील वेळेत थोडा फरक असू शकतो

दीड दिवसांचा गणपती कधी विसर्जित करायचा?

पंचांगानुसार, दीड दिवसांच्या गणपतीसाठी मंगळवार, 15 सप्टेंबर 2026 हा विसर्जनाचा दिवस आहे. याच दिवशी गणपतीची उत्तरपूजा करून बाप्पाला निरोप दिला जातो. विसर्जनासाठी एकच वेळ सर्व महाराष्ट्रासाठी समान नसते. शहर, स्थान आणि पंचांगानुसार चौघडिया तसेच मुहूर्ताच्या वेळेत फरक पडू शकतो. त्यामुळे तुमच्या शहरानुसार अचूक वेळ पाहणे योग्य ठरेल.

विसर्जनापूर्वी काय करावे?

गणपती विसर्जनाच्या आधी घरातील गणपतीची नेहमीप्रमाणे पूजा करून आरती करावी.

बाप्पाला नैवेद्य दाखवावा. त्यानंतर उत्तरपूजा करून गणपतीसमोर मनोभावे प्रार्थना करावी.

घरातील सर्व सदस्यांनी बाप्पाचे दर्शन घेऊन सुख-समृद्धी आणि कुटुंबाच्या मंगलतेसाठी आशीर्वाद मागावा.

यानंतर “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” असा जयघोष करत गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेली जाते.

यंदाच्या गणेशोत्सवातील महत्त्वाच्या तारखा

2026 मध्ये गणेश चतुर्थी 14 सप्टेंबरला,
दीड दिवसांचे गणपती विसर्जन 15 सप्टेंबरला,
गौरी आवाहन 17 सप्टेंबरला,
गौरी पूजन 18 सप्टेंबरला,
तर अनंत चतुर्दशी 25 सप्टेंबर 2026 रोजी आहे.

admin
Author: admin

और पढ़ें