बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) माजी मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) हिच्या मृत्यूबाबत सीबीआय (CBI) चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले. तसेच, या प्रकरणी एफआयआर (FIR) दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिलेले. अशातच आता न्यायालयाच्या आदेशानुसार, सीबीआयनं याप्रकरणी एफआयआर दाखल केलाय. तसेच, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या चौकशीची सीबीआय मागणी करणार आहे. याव्यतिरिक्त दिनो मारिया, रिया चक्रवर्तीच्या चौकशीचीही सीबीआय मागणी करणार आहे. दरम्यान, CBI कडून एफआयआरची कॉपी हायकोर्टाला दिली जाणार आहे.
दिशाचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या मुलीच्या मृत्यूची नव्यानं चौकशी करण्याची आणि सीबीआयद्वारे तपास करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हायकोर्टानं दिलासा देत, याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश, सीबीआयला दिलेले. आता या प्रकरणी तीन पानांचा एफआयआर आणि सात पानांचा जबाब सादर करण्यात आला आहे.
दिशा सालियानच्या मृत्यूचा घटनाक्रम
8 जून 2020
दिशाचा मुंबईतल्या मालाडमध्ये इमारतीवरुन पडून मृत्यू
14 जून 2020
सहा दिवसांनी अभिनेता सुशातसिंग राजपूतचा मृत्यू
16 जून 2020
दिशाच्या मृत्युचे राजकारण,सनसनाटीपणा नको असं कुटुंबीयांचं आवाहन
22 डिसेंबर 2023
आ.नितेश राणे यांच्याकडून आदित्य ठाकरे, दिनो मारियावर आरोप, सरकारकडून एसआयटीची स्थापना
जुलै 2025
‘दिशाने आत्महत्या केली, लैंगिक अत्याचार झाले नाहीत’ असे पोलिसांचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
20 मार्च 2025
दिशाची बलात्कार करुन हत्या झाली, सीबीआय चौकशी करा अशी सतीश सालियन यांची हायकोर्टात मागणी
2 सप्टेंबर 2026
नव्यानं एफआयआर दाखल करुन चौकशी करा असे सीबीआयला हायकोर्टाचे आदेश
14 सप्टेंबर
वडील सतीश सालियान यांचा जबाब नोंदवून सीबीआयकडून एफआय दाखल
नेमकं प्रकरण काय? (Disha Salian Death Case)
दिशा सालियनच्या गूढ मृत्यूचे प्रकरण अतिशय गाजलेले आणि वादग्रस्त आहे. 2022 मध्ये महाराष्ट्र विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. शिवसेनेचे (शिंदे गटाचे) आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियनच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला आणि चौकशीची मागणी केली. या मुद्द्यावरून सभागृहात आमदारांमध्ये बराच गोंधळ झाला होता. या प्रकरणात, नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणीही केली होती. दिशा सॅलियन एक सेलिब्रिटी मॅनेजर होती. तिने वरुण शर्मा, सुशांत सिंग राजपूत, भारती सिंग सारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले. दरम्यान, दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होतं, असं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मात्र तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असं रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.








