Search
Close this search box.

गणपती शॉपिंगसाठी रविवारी बाहेर पडणार आहात? आधीच बघा 13 सप्टेंबरला मुंबई लोकलचा कुठे आहे मेगा ब्लॉक!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रविवार, 13 सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेकडून मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येत असून, याचा थेट परिणाम ठाणे-कल्याण तसेच ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवांवर होणार आहे. त्यामुळे रविवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे.

ठाणे-कल्याण मार्गावर 5 तासांचा मेगा ब्लॉक

ठाणे आणि कल्याणदरम्यानच्या अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. या काळात मुलुंडहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या काही धीम्या आणि अर्धजलद लोकल फास्ट मार्गावर वळवण्यात येतील. या लोकलना ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली येथे थांबे दिले जातील. त्यामुळे संबंधित गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा साधारण 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचण्याची शक्यता आहे. कल्याणहून मुलुंडच्या दिशेने जाणाऱ्या काही अप धीम्या आणि अर्धजलद लोकलदेखील या कालावधीत फास्ट मार्गावरून चालवण्यात येतील. या गाड्या डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे येथे थांबतील. मुलुंडनंतर त्या पुन्हा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

याशिवाय CSMT येथून सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान सुटणाऱ्या किंवा तेथे पोहोचणाऱ्या धीम्या लोकलवरही परिणाम होणार असून, त्या सुमारे 10 मिनिटे उशिराने धावू शकतात.

ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द

ठाणे ते वाशी/नेरुळदरम्यानच्या अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 या वेळेत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात ठाणेहून वाशी, नेरुळ आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या तसेच या स्थानकांहून ठाण्याकडे येणाऱ्या लोकल सेवा रद्द राहतील. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा विचार करणे आवश्यक आहे. दरम्यान, बेलापूर-उरण मार्गावरील लोकल सेवा रविवारीच्या नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत.

मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, रेल्वेच्या पायाभूत सुविधांची देखभाल आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें

‘वंशावळ सिद्ध करा, नियमाप्रमाणे SEBC किंवा कुणबी एकच निवडावं लागेल, आज-उद्या प्रमाणपत्र द्या ते शक्य नाही, त्याची प्रोसेस आहे..’ मनोज जरांगेंच्या मागण्यांवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले नियम