Search
Close this search box.

Vanita Kharat Scam: ‘तुमचं पार्सल येणार आहे, डिलिव्हरी बॉयला पत्ता मिळत नाहीय’ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनीता खरातसोबत घडला 62 हजाराचा स्कॅम

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आज-काल सायबर फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येताना दिसतात. सर्वसामान्यांपासून कलाकारांपर्यंत अनेक जण या अशा फसवणुकीचा सामना करताना दिसतात. अकाउंट हॅक केले जातात, डिजिटल अरेस्टच्या नावाखाली अनेकांना लुटण्याचे प्रकार समोर येत आहेत. फ्रॉड मेसेज, कॉल करून सापळा रचून फ्रॉड करणाऱ्यांची संख्या वाढलेली असताना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात  ( Vanita Kharat) सोबत असाच काहीसा प्रकार घडला. डिलिव्हरी बॉयला पत्ता सापडत नाही, असा कॉल करून एका व्यक्तीने वनिता खरातचं व्हाट्सअप अकाउंट हॅक केलं. लोकांना अडचणीत असल्याचे सांगून पैसे उकळले. या संदर्भात तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला. अनेकांनी तिच्या video च्या कमेंट सेक्शनमधे त्यांच्या सोबत घडलेल्या प्रकाराविषयी सांगितले.

काय म्हणाली वनिता खरात?

‘ काल माझ्याबरोबर एक गोष्ट घडली. एक scam झालाय. तुमच्या बरोबर होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. माझं एक पार्सल येणार होतं. आणि मला एक फोन आला. ‘ ब्लू डार्ट कंपनीमधून बोलतोय, तुमचं पार्सल येणार आहे पण डिलिव्हरी बॉयला तुमचा पत्ता मिळत नाहीये. त्यामुळे तुमचा पत्ता या- या नंबर वर पाठवा. मी त्याला म्हणाले की, ‘माझा पत्ता आहे ऑलरेडी.. जिथून मी पार्सल मागवलं आहे त्यांच्याकडे. त्यामुळे असं होऊच शकत नाही, असं होत नाही.’ पण त्याने दोनदा तीनदा फोन केले. आणि मी त्याने जो कुठला नंबर सांगितला होता तो डायल केला. आणि काही सेकंदात माझं व्हाट्सअप हॅक झालं. माझ्या फोनमधून लॉग आऊट झालं. त्याने माझे कॉल्स त्याचा नंबरवर फॉरवर्ड केले. मला फोन घेणं बंद झालं. माझ्या व्हाट्सअप वरून सगळ्या माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टला जेवढे नाव होती त्या सगळ्यांना असा मेसेज गेला- की तुम्ही मला मदत करू शकता का.. मी खूप अडचणीत आहे.. मला एवढे एवढे पैसे पाठवा.. 62 हजार वगैरे पाठवा.. त्यामुळे त्यावर माझ्या बऱ्याच मित्रांनी रिप्लाय केले. काही काहींनी पैसे पाठवले.’

वनिता खरातने केलं चाहत्यांना सावध

ती पुढे म्हणाली, ‘त्यामुळे खूप वाईट गोष्ट घडली. की तुमच्या बरोबर घडू नये. मुळात ब्ल्यू डार्ट ही मोठी कुरिअर कंपनी आहे. त्याच्यावरती आपण सगळे विश्वास ठेवतो. हा डेटा कसा लिक होतो, त्यांच्या नावाने, त्यांच्या कंपनीच्या नावाने असेच काम होतात याकडे त्यांनी लक्ष दिल पाहिजे. यापुढे तुम्हाला जर असे काही कॉल आले, तर अजिबात त्यांना एंटरटेन करू नका. पूर्ण माहिती घ्या आणि त्या नंबरला ब्लॉक करा. तुम्हाला थोडा जरी संशय आला, तुमच्या बाबतीत असं काही घडलं तर सायबर सेलला कंप्लेंट करा. व्हाट्सअपवर असे काही मदतीचे मेसेज आले तर आधी क्रॉस चेक करा. पैसे पाठवण्याच्या आधी करा. खूप काळजी घ्या. कोणत्याही प्रकारे स्कॅम होऊ शकतो. पण आपण त्या क्षणात काय करू, हे आपल्याला काहीच कळत नाही. आणि ते आपल्या सोबत घडतं. माझ्याकडून जरासे काही मेसेज आले असतील, तर माझं अकाउंट हॅक झालं होतं. या मेसेजमुळे बऱ्याच जणांच्या मनात गैरसमज निर्माण होऊ शकतो, वनिताने पैशांसाठी मेसेज केलेत. माझी बदनामी होऊ शकते. पुन्हा एकदा सगळ्यांना सॉरी. माझ्या हातात काहीच नव्हतं. आता माझं व्हाट्सअप रिकव्हर झाला आहे. तुम्ही सुद्धा काळजी घ्या. मोठ्या मोठ्या कंपन्यांनी काळजी घेतली पाहिजे की आपल्याकडचा डेटा कसा लिक होतो. याकडे लक्ष द्या. फसवणुकीला भुलू नका.’ असं वनिता खरात म्हणाली.

admin
Author: admin

और पढ़ें