Search
Close this search box.

‘आंदोलनाने समस्या सुटतात असं फार कमी, भारताविरुद्ध….’; फ्रान्समधील हिंसाचाराचा उल्लेख करत मोहन भागवतांचा इशारा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षाच्या भव्य समारोपानिमित्त नागपूरात रेशीमबाग मैदानावर विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधन केले. यावेळी मोहन भागवत यांनी भारतात सरकारविरोधात सुरू असलेली आंदोलनं आणि मोर्चे याबाबत एक सूचक वक्तव्य केलं आहे. रेजीम चेंज केल्याने परिस्थिती बदलेल असे अनेकाना वाटत आहे. मात्र पूर्वीही असे घडलेले नाही आणि पुढेही होणार नाही, असं भागवत यांनी म्हटलं आहे.

पाश्चिमात्य जगातून एक वादळ उठला आहे, तो विश्वातील सभ्यता, मांगल्य, सांस्कृतिक मूल्ये आणि मानवी संस्कार नष्ट-भ्रष्ट करून टाकण्याचा वादळ आहे. फ्रान्स, अल्बेनियासारख्या अनेक देशांमध्ये हे सर्व घडत आहे. रेजीम चेंज केल्याने परिस्थिती बदलेल असे अनेकाना वाटत आहे. मात्र पूर्वीही असे घडलेले नाही आणि पुढेही होणार नाही. आसुरी ताकत भारता विरुद्ध कार्य करत आहे. भारत मोठा झाला, तर त्या आसुरी शक्तींच्या हेतूंना बाधा पोहोचवेल म्हणून भारतही या वादळाचा लक्ष ठरला आहे, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

ते भारत तोडण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांना काही लोकांची साथ असते काही अति महत्वकांक्षी नेताही त्यांना भेटतात. लोकशाहीमध्ये आंदोलन होतीलच. मात्र त्यांचा उद्देश काय असायला हवा. आंदोलनाचा उद्देश समस्यांचा समाधान असला पाहिजे. आंदोलनातून समस्येचा समाधान होणार नाही. तर समाजाच्या सक्रिय सहभागातूनही समस्यांचे निराकरण होऊ शकते, असंही भागवत म्हणाले आहेत.

आंदोलन वेगळ्या उद्देशाने होत असेल राजनीतिचे साधन होते. त्याचा लाभ भारताला नुकसान करणारे घेतील. देशातील समाजव्यवस्थेत अश्रद्धा निर्माण करणे व व्यवस्था आणि आरोग्य वातावरण निर्माण करणे ही त्यांची कार्यपद्धती आहे. पहिले पण होती आजही ती सुरू आहे. भारताला दाबण्यासाठी विश्वात अनेक शक्ती आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

हिंदुभाव आणि हिंदू स्वभाव- एकतेचा आधार

आपल्या राष्ट्राची चेतना हीच सनातन जीवनदृष्टी आहे. आज भारतातील आपण सर्वजण आणि संपूर्ण विश्वही या जीवनदृष्टीला ‘हिंदू दृष्टी’ या नावाने ओळखते. विशिष्ट उपासना पद्धती, खानपान, राहणीमान, सामाजिक अथवा राजकीय विचारधारा, तसेच विशिष्ट जात, भाषा किंवा प्रदेश यांपैकी कोणत्याही गोष्टीचे बंधन या जीवनदृष्टीला नाही. या सर्वांच्या पलीकडे असलेली आध्यात्मिकता, मानवता आणि विश्वबंधुत्व ही तिची प्रमुख लक्षणे आहेत, असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

admin
Author: admin

और पढ़ें