कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची खळबजनक घटना पुण्यात घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या कंत्राटदाराने एक व्हिडिओ शूट केला होता. तसेच मृत्यूपूर्वी सुसाईड नोटही लिहिली होती. या प्रकरणात आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकरसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
खलील शेख असं आत्महत्या करणाऱ्या कंत्राटदाराचे नाव आहे. खलील शेख याने गुलटेकडी येथे राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवलं आहे. आर्थिक वाद, पैशांची देवाणघेवाण आणि बुडालेले पैसे यातून उद्भवलेल्या प्रकरणातून कंत्राटदाराने आत्महत्या केली आहे. पुण्यातील डायस प्लॉट या भागात ही घटना घडलं.
खलील शेख आत्महत्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर त्यांची पत्नी यांच्यासह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्याविरोधात पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांची पत्नी, मनसे माजी नगरसेवक बाळासाहेब शेंडगे यांच्यासह इतर भागिदारांचीही नावं या कंत्राटदाराने सुसाईड पूर्वी केलेल्या व्हिडिओत घेतली होती. या दोघांसह इतर अनेक जणांवर स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला गुन्हा दाखल झाला आहे. खलील शेख याने आत्महत्या करताना सुसाईड नोट लिहीली होती. यात रवींद्र धंगेकर त्यांच्या पत्नी आणि इतर काही जणांनी माझी आर्थिक फसवणूक केली असा आरोप आत्महत्या करण्यापूर्वी केला होता. आर्थिक व्यवहारातून आत्महत्या करत असल्याचं सांगत राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.








