जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली असून, यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तसंच तब्बल 200 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळाचे अनेक फोटो समोर आले असून यामध्ये ग्रँड रोडवर शेकडो भाविकांची गर्दी दिसत आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने आपातकाली पथकं आणि स्वयंसेवकांना या गर्दीतून मार्ग काढण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.








