Search
Close this search box.

बलात्कार करुन हत्या, चेहरा विद्रुप केला; पण चिप्सचे पाकिट ठरले पुरावा, नागपूरमधील ‘त्या’ हत्याकांडाचा अखेर उलगडा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नागपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वृद्ध महिलेच्या अत्याचार व हत्येच्या प्रकरणाचा उलगडा नागपूर पोलिसांनी मार्वल आणि एआयच्या मदतीने केला आहे. इतकंच नव्हे तर, चिप्सच्या पाकिटाच्या तुकड्यावरुन पोलिसांनी आरोपीला शोधून काढलं आहे. या प्रकरणी 48 वर्षीय आरोपीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.

बलात्कारानंतर झालेला खून, उष्णतेमुळे विद्रूप झालेला मृतदेह, मृत महिलेची न पटत असलेली ओळख, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा अभाव आणि घटनास्थळी नसलेला ठोस पुरावा यामुळे रहस्यमय बनलेल्या खुनाचा गुंता अखेर नागपूर ग्रामीण पोलिसांनी 10 दिवसांच्या अथक तपासानंतर उलगडला आहे. अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), न्यायवैद्यक तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलिसांनी आरोपी सुधाकर मंडपेचा शोध घेत त्याला बोखारा येथून अटक केली.

मृतदेहाजवळ पडलेल्या चिप्स पुड्याच्या पाकिटाचा छोटा तुकडा पोलिसांना मारेकऱ्यापर्यंत नेण्यात कामी आला. 27 जूनला पाटणसावंगी शिवारात एका निर्जनस्थळी वृद्ध महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. अत्यंत पाशवी पद्धतीने अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. महिलेचा चेहरा देखील पूर्णतः विद्रुप झाला होता. निर्जनस्थळी घडलेल्या घटनेतील मयत महिला कोण व कुठली तसेच आरोपीचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हानात्मक होते. महिलेची ओळख पटवणे आधी पोलिसांसाठी सर्वांत मोठे आव्हान होते. त्यामुळे याप्रकरणात पोलिसांनी पारंपरिक तपासासोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचीही मदत घेतली.

पोलिसांनी अगोदर मार्वल- एआय या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणालीच्या मदतीने उपलब्ध छायाचित्रांवर प्रक्रिया करून मृत महिलेचा चेहरा वास्तवदर्शी स्वरूपात पुनर्निर्मित केला. त्यानंतर हा पुनर्निर्मित फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला. त्यातून एक धागा मिळाला. एका समाजसेवकाने खापरखेडा परिसरातील ही वृद्ध महिला आढळून आल्याचे सांगितले. त्यावरून अगोदर नागपूर ग्रामीण पोलिसांनी त्या महिलेची ओळख पटवली. घटनास्थळ परिसरात एक चिप्स पॅकेट सुद्धा आढळून आले होते. त्यावरून संबंधित चिप्स कंपनीशी संपर्क साधून त्या मार्गावर कुठे कोणत्या दुकानात हे चिप्स विक्री झाली ही माहिती घेण्यात आली. त्यानंतर चिप्स पॅकेट मिळणाऱ्या दुकानांच्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्याकरता तब्बल 182 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणात ही महिला एका व्यक्तीबरोबर बाईकवर दिसली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली. तो व्यक्ती एका ट्रॅव्हलच्याच्या काउंटरवर सीसीटीव्हीत ओझरता दिसला होता. या
संशयिताची प्रतिमा अस्पष्ट होती. त्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने संशयिताचा संभाव्य चेहरा तयार करण्यात आला. एआयद्वारे तयार केलेल्या संशयिताच्या चेहऱ्याची 15 किलोमीटर परिघातील माहितीशी पडताळणी करण्यात आली. अखेर हा फोटो एका संशयिताशी जुळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळापासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावरील बोखारा येथून सुधाकर दादाराव मंडपे (48) याला अटक केली.

यापूर्वीही केला होत लैंगिक अत्याचार

धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी ज्येष्ठ महिलेवर केलेल्या बलात्कार आणि खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला सुधाकर मंडपे याने 20 वर्षांपूर्वी देखील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिसांना तपासात आढळले आहे.

admin
Author: admin

और पढ़ें