Search
Close this search box.

पिंपरी चिंचवडच्या मोशीमधील इमारत दुर्घटनामध्ये 18 तासानंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरू, 9 जणांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुण्यातील मोशी मधल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील इमारत कोसळल्यानंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत एकूण 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आल आहे. यापूर्वी 6 जणांची सुटका करण्यात आली होती, तर आता आणखी 3 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, तळमजल्यात अजून काही कर्मचारी अडकल्याची भीती असून, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती आहे. हे कर्मचारी गेल्या 18 तासांपासून बिल्डिंगखाली अडकले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी लष्कर, NDRF, पिंपरी-चिंचवड अग्निशमन दल आणि पिंपरी-चिंचवड पोलीस यांच्यासह विविध यंत्रणा संयुक्तपणे बचावकार्य करत असून, रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे.

दुर्घटनेमध्ये नऊ जणांना बाहेर काढण्यासाठी अजूनही शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. लष्कर एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

या दुर्घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेले मंत्री गिरीश महाजन यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. अतिवृष्टीमुळे हा कचऱ्याचा डोंगर खचला आहे, ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. जास्त पाऊस पडल्याने कचरा डेपोचे पाणी इमारतीमध्ये आल्याने इमारत पडली. अत्यंत कमी कालावधीत 600 मिमी इतका प्रचंड पाऊस पडला, ज्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. त्यांनी सांगितलं की, तीन लोकांना आतमध्ये जाऊन चहा आणि बिस्किटे दिली आहेत. मात्र, दुर्दैवाने त्यांना सध्या बाहेर काढता येत नाहीये. त्यांचे पाय पिलरखाली अडकलेले आहेत. ते दिसत असूनसुद्धा त्यांना बाहेर काढता येत नाहीये. आणखी जवळपास 12 जण आत असण्याची शक्यता असून, त्यातील तीन जणांपर्यंत आमचा संपर्क झाला आहे. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्याचा आमचा शर्थीचा प्रयत्न सुरु आहे.

admin
Author: admin

और पढ़ें