Search
Close this search box.

केतनच्या हत्येआधीच सियाने करुन ठेवली जामीन मिळवण्याची तयारी? धक्कादायक माहिती समोर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लोहगडावरुन धक्का देऊन केतन अगरवालचा जीव घेणाऱ्या सिया गोयलने पूर्ण तयारी करुनच ही हत्या केल्याचं समोर येत आहे. कथित प्रेयसी चेतन चौधरीच्या मदतीने कट रचून ही हत्या घडवल्याची माहिती आता तांत्रिक तपासामधूनही समोर येत आहे. सियाच्या गुगल सर्च हिस्ट्रीमधून तिने गुन्हा केल्यानंतर कायद्याच्या कचाट्यातून कसं बाहेर पडता येईल याचा अभ्यासही केल्याची समोर आलं आहे. विशेष म्हणजे सियाने यासाठी मेघालय हनीमून मर्डर केस प्रकरणामध्ये प्रियकराच्या मदतीने राजा रघुवंशीचा जीव घेणाऱ्या सोनम रघुवंशीने काय काय केलं होतं याची माहिती गुगलवर चर्च केल्याचं आता तपासात समोर आलं आहे.

सियाने काय काय शोधलं?

राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील तपशील सियाने सविस्तर वाचला होता. त्यासाठी तिने गुगलची मदत घेतली होती. सोनम रघुवंशीने पतीची हत्या कशी केली, नंतर काय घडलं हे शोधतानाच सियाने आपणही असा गुन्हा केल्यानंतर काय होऊ शकतं याचा अंदाज बांधताना पोलिसांच्या ताब्यात आपण सापडलो तर काय या शक्यतेवरुनही माहिती सर्च केल्याचं दिसून आलं. सोनम रघुवंशी प्रकरण पोलिस कसं हाताळलं हे शोधण्याबरोबरच सियाने आपणही सोनमप्रमाणे अडकलो तर पुढे काय याचा विचारही आधीच करुन ठेवलेला.

सोनमच्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न?

केतनला संपवल्यानंतर सोनमप्रमाणे आपल्यालाही पोलिसांनी पडलं तर जमानत मिळवण्यासाठी सोनमच्याच मार्गाने जाण्याचा विचार सियाच्या डोक्यात सुरु असल्याचं तांत्रिक तपासातून समोर आलं आहे. सोनमला जामीन कसा मिळाला होता? यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार करण्यात आला? या साऱ्याची माहितीही सियाने गुगलवरुन शोधल्याचं समोर आलं आहे.

दोन्ही प्रकरणांमध्ये धक्कादायक साम्य

विशेष म्हणजे सोनम आणि सिया या दोन्ही प्रकरणांमध्ये बरेच साम्य आहे. दोघींनीही आपल्या घरच्यांनी लग्न लावून दिलेल्या किंवा लग्न लावण्याच्या तयारीत असलेल्या जोडीदाराला संपवलं. दोघींनीही आपल्या जोडीदाराला उंचावरुन खाली खोल दरीत ढकललं. दोघींनाही त्यांच्या प्रियकराने या कृत्यामध्ये मदत केली. याच पार्श्वभूमीवर सियानेही अशाप्रकारेच केतनला संपवण्याचा कट रचला आणि 18 जून रोजी त्याच्यासोबत लोहगडावर फिरायला गेल्यानंतर त्याला दरीत धक्का दिला. केतनचा यामध्ये मृत्यू झाला तेव्हा हा सारा अपघात वाटला. मात्र नंतर एक एक करत नवे खुलासे होत गेले आणि सिया वर तिचा प्रियकर चेतन या दोघांनी कट रचून केतनला संपवल्याची खळबळजन माहिती समोर आली.

सध्या सिया आणि केतन या दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करत आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें