Search
Close this search box.

आळंदीत माऊलींच्या मंदिरातील दानपेटीवर डल्ला, सेवेकराच्या घरात पावणेचार लाखांची रोकड!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 आळंदीच्या संत ज्ञानेश्वर मंदिरात सेवेकऱ्यांन दानपेटीवर डल्ला मारल्यानंतर मंदिर समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यापासून सेवेकरी दानपेटीतून चोरी करत होता, मात्र अखेर तो पकडला गेला आणि त्यानंतर मंदिर समितीनं नव्यानं काही उपाययोजना केल्या आहेत? सविस्तर जाणून घेऊया.

आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात सेवेकरी म्हणून काम करत असलेल्या विशाल वारुळेनं मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारलाय.या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीच्या घराची झाडाझडती 10, 20, 50 आणि शंभर रुपयांच्या नोटांनी भरलेल्या पिशव्यांमधून पावणेचार लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा हा उद्योग सुरु होता, आरोपी विशाल मंदिरातील हार घेऊन जात असल्याचं सांगत पैसे घेऊन जात होता पिशवीमध्ये वरती हार आणि खाली पैसे ठेवत त्यानं लाखो रूपये पसार केल्याचं आता उघड झालंय, सीसीटीव्हीमध्ये संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर त्याचं बिंग फुटलंय.

या घटनेनंतर विशाल वारुळे याला अटक केली असली तरी मंदिर विश्वस्त समितीच्या कामकाजावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत. दानपेटी मधील पैसे हाताळण्याचे महत्वाचं काम या सेवेकराला कशाच्या आधारे दिले? एवढे महिने तो पैसे चोरत होता तर सीसीटीव्हीमध्ये ते का तपासलं गेलं नाही? तो कुणाच्या जवळचा होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत.. मात्र त्याने मंदिरात सेवा देत विश्वास संपादन केल्याचं मंदिर समितीनं स्पष्ट केलंय.

या घटनेनंतर विश्वस्त समितीनं मंदिरात कर्मचाऱ्यांसाठी नियम बदलले आहेत. सॉफ्टवेअरची मदत घेऊन कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जाणार आहे, तसंच सर्व कर्मचाऱ्यांना हनुमान मंदिरातूनच प्रवेश दिला जाणार आहे. चोरीच्या घटनेनंतर मंदिर विश्वस्त समितीने विविध उपाय योजना सुरू केल्या आहेत. मात्र, सीसीटीव्ही असतानाही एक व्यक्ती तीन महिन्यांपासून चोरी करत होता आणि ते कोणाच्याही लक्षात कसं आलं नाही? यासंदर्भात आश्चर्य व्यक्त केलं जातंय, मात्र अखेर सीसीटीव्हीच्या आधारेच तो सापडला आणि त्याच्या चोरीचं बिंग फुटलं.

admin
Author: admin

और पढ़ें