कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यातील दुबारे येथे दोन हत्तींमधील झुंजीदरम्यान एका पर्यटक महिलेचा (Dubare Elephant Attack) चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. कावेरी नदीकाठी उभी राहून पर्यटकांकडून हत्तींना आंघोळ घातली जाताना ती पाहत होती. झुंजीवेळी एका हत्तीचा (Dubare Elephant Attack) तोल गेला आणि तो तिच्यावर कोसळला. जिनसू असे ३३ वर्षीय मयत महिलेचे नाव असून ती तमिळनाडूतील चेन्नई येथील पल्लवरम येथील रहिवासी होती. या दुर्घटनेतून तिचा पती आणि चिमुरडी लेक या दुर्घटनेतून बचावल्या. कर्नाटकातील प्रसिद्ध दुबारे हत्ती कॅम्पमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चेन्नई येथील महिला पर्यटकाचा हत्तींच्या झटापटीत मृत्यू झाल्यानंतर आता या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ‘मार्थांडा’ या प्रशिक्षित हत्तीचाही मृत्यू झाला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली.(Dubare Elephant Attack)
Dubare Elephant Attack : दोन हत्तींत अचानक झटापट सुरू झाली
कोडगू जिल्ह्यातील दुबारे हत्ती कॅम्पमध्ये सोमवारी हत्तींच्या आंघोळीच्या वेळी ‘कंजन’ आणि ‘मार्थांडा’ या दोन हत्तींत अचानक झटापट सुरू झाली होती. या संघर्षात ‘मार्थांडा’च्या पोट आणि पायाजवळ गंभीर दुखापती झाल्या. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुजीब आणि चेट्टियप्पा यांनी त्याच्यावर उपचार केले, मात्र अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.(Dubare Elephant Attack)
या घटनेत चेन्नई येथील ३३ वर्षीय पर्यटक जिनसू हिचाही मृत्यू झाला होता. ती आपल्या पती आणि मुलीसह दुबारे कॅम्पला भेट देण्यासाठी आली होती. नदीकिनारी उभी राहून ती हत्तींची आंघोळ पाहत असताना अचानक दोन हत्ती एकमेकांवर धावून गेले. वन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, माहूतांनी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र ‘कंजन’ने ‘मार्थांडा’वर जोरदार हल्ला केला. या झटापटीदरम्यान ‘मार्थांडा’चा तोल गेला आणि खाली कोसळला. त्याखाली जिनसू अडकली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तिचे पती आणि मूल थोडक्यात बचावले.(Dubare Elephant Attack) घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही पर्यटकांनी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यामध्ये महिलेचा पती मुलाला हातात घेऊन पत्नीला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे.
उपवनसंरक्षक (DCF) अभिषेक यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या घटना कॅम्पमध्ये अत्यंत दुर्मिळ आहेत. “सामान्यतः एका हत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच जणांची आवश्यकता असते. ही एक दुर्दैवी अपघाती घटना होती,” असे त्यांनी म्हटले. तसेच सरकारने या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल मागवला आहे. या घटनेनंतर कर्नाटक सरकारने डुबारे हत्ती कॅम्प दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वन, पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र मंत्री ईश्वर खंड्रे यांनी या घटनेची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश देत राज्यातील सर्व हत्ती कॅम्पमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कठोर नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन नियमांनुसार, पर्यटकांना आता हत्तींची आंघोळ किमान १०० फूट अंतरावरूनच पाहता येणार आहे. तसेच हत्तींना स्पर्श करणे, जवळ जाऊन फोटो काढणे, त्यांना अंघोळ घालणे किंवा केळी, ऊस, गूळ यांसारखे पदार्थ हाताने खाऊ घालण्यास बंदी घालण्यात आली आहे.








