Search
Close this search box.

Gold Rates: सुवर्णनगरीत सोनं झालं स्वस्त; दिवाळी पाडव्याला पत्नीसाठी घ्या सोनं, 10 ग्रॅम सोन्याचा आजचा लेटेस्ट दर किती?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दिवाळी (Diwali) सणाला सुरुवात झाली आहे.  आज दिवाळी सणाचा चौथा दिवस.  दिवाळी पाडवानिमित्त सोनं (Gold Price) खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जळगावच्या सराफा बाजारातून (Jalgaon Gold Market) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.  दिवाळी सणानिमित्त (Diwali Gold) सोन्याच्या दरात  आज 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल 10 ग्रॅम सोन्याचा (Gold And Silver Rate) दर जीएसटीसह 1 लाख  43 हजार 500 रुपये होता.  आज त्यात एक  हजार रुपयांची घट झाली आहे.

आजचा सोन्याचा दर किती? जाणून घ्या सोनं अन् चांदीचा लेटेस्ट दर (Diwali Gold And Silver latest price)

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव अर्थात सुवर्णनगरीत  कालच्या सोन्याच्या दराच्या तुलनेत आजच्या सोन्याच्या दरात 1000 रुपयांची घसरण झाली आहे.  काल सोन्याचा दर 1 लाख 43 हजार 500 रुपये इतका  होता.  त्यात एक हजार रुपयांची घट झाली आहे.  आजचा सोन्याचा दर 1 लाख 42 हजार 500 रुपये इतका आहे.  सोन्याच्या दरात बदल झाला असला तरी, चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.   माहितीनुसार, काल जीएसटीसह एक किलो चांदीचा दर 1 लाख 90 हजार रुपये होता.

चांदीच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही. आजही चांदीचा दर त्याच पातळीवर कायम आहे. या कारणामुळे सोनं तसेच चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार, भारतात 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरात  मोठी घसरण झाली आहे. 24 कॅरेट 1 तोळं सोन्याच्या दरात  490 रुपयांची घसरण झाली आहे.  1 तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला 1,44,110 रुपये मोजावे लागतील.  तर, 24 कॅरेट 10 तोळं सोन्याच्या दरात 4,100 रुपयांची घसरण झाली आहे.  10 तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला 1,441,100 रुपये मोजावे लागतील.  यासह 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

22 कॅरेट  1 तोळं सोन्याच्या दरात  450 रुपयांची घसरण झाली आहे.  1 तोळं सोनं खरेदीसाठी ग्राहकांना 1,32,100 रुपये मोजावे लागतील.   22 कॅरेट 10  तोळं सोन्याच्या दरात 4,500 रुपयांची घसरण झाली आहे.  सोनं खरेदीसाठी आपल्याला 1, 321,000 रुपये मोजावे लागतील, अशी माहिती आहे.

admin
Author: admin

और पढ़ें