केंद्र सरकारने 1 मे 2026 पासून डिझेल आमि एव्हिएशन टर्बाइन फ्युएलचा ( ATF ) निर्यात कर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तर पेट्रोल आणि डिझेलवरील निर्यात करात कोणताही बदल झालेला नाही. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक तेल बाजारावर मोठा परिणाम होत असून याचा तेल कंपन्या, शेअर बाजार आणि विशेषतः सामान्य माणसांवर काय परिणाम होणार ते जाणून घेऊया.
काय बदलले?
दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणे डिझेल आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवरील विंडफॉल शुल्क कमी करण्यात आले आहे. यामुळे तेल कंपन्यांचा खर्च कमी होणार आहे. डिझेलच्या निर्यातीवरील कर 55.5 रुपये प्रति लिटरवरून 23 रुपये प्रति लिटरपर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच एटीएफवरील शुल्क 42 रुपये प्रति लिटरवरून 33 रुपये प्रति लिटरपर्यंत कमी करण्यात आले आहे. तर, पेट्रोलच्या निर्यातीवरील शुल्क अजूनही शून्यच आहे. याशिवाय पुढील पंधरवड्यासाठी डिझेलवरील रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकरही माफ करण्यात आला आहे.








