Search
Close this search box.

पुणे हादरलं! 65 वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुरडी गोठ्यात नेलं आणि…, अत्याचार करुन शेणामध्ये मृतदेह लपवला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महाराष्ट्राला हादरून सोडणारी आणि मन सुन्न करणारी घटना पुण्यातील भोर तालुक्यातून समोर आली आहे. भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये साडेतीन वर्षीय चिमुरडीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून गामस्थ आक्रमक झाल्याचे पाहिला मिळाले. मुलीचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवून गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनही केलं. यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान घटनेच्या निषेधार्थ आज नसरापूर बंदची हाक देण्यात आली आहे.

नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुरडी गोठ्यात नेलं आणि…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुरडी शाळेला उन्हाळ्याचा सुट्टी लागली म्हणून आजीच्या गावाला आली होती. शुक्रवारी दुपारी नसरापूरमधील राम मंदिराजवळ ही चिमुकली खेळत होती. एका 65 वर्षीय नराधमाने तिला आमिष दाखवलं. त्यानंतर ती जवळ आल्यावर तिला जवळच्या गुरांच्या गोठ्यात घेऊन गेला. तिथे या नराधमाने चिमुरडीवर निर्दयीपणे शारीरिक अत्याचार केला. या विकृत माणूस इथेच थांबला नाहीतर त्याने त्यानंतर तिची निघृणपणे हत्या केली. या चिमुकलीचा मृतदेह कोणाला सापडू नये म्हणून गोठ्यातील शेणामध्ये त्याने तो लपवला.

बराच वेळ झाला नात घरी आली नाही, म्हणून कुटुंबातील सदस्यांनी तिची शोधाशोध सुरु केली. पण तिच्या गावात कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. गावकऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासला. तर एक अपरिचित व्यक्ती त्या मुलीला बाजूला घेऊन जाताना दिसला. त्यानंतर गोठ्यात कुटुंबातील लोकांनी पाहिला तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीचा मृतदेह शेणात लपवल्याचा आढळला.

दुसरीकडे गावकऱ्यांनी त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली तो नराधम नदी काठी बसलेला आढळला. त्यांनी मुली कुठे आहे, तू तिच्यासोबत काय केलं असं प्रश्न विचार त्याला पडकलं. तर त्याने मला काही माहिती नाही असंच उत्तर तो देत होता. दरम्यान गावातील या घटनेची माहिती पोलिसांनी मिळतात ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नराधमाला ताब्यात घेतलं.

admin
Author: admin

और पढ़ें