Search
Close this search box.

Solapur Crime : कुजलेल्या अवस्थेत सापडला जिम ट्रेनरचा मृतदेह, वस्तूंवरली पटली ओळख; 14 दिवसांपासून होता बेपत्ता

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सोलापुरातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका जिम ट्रेनरचा मृतदेह सोलापूर-विजापूर रस्त्यावरील सैफुल भागात झाडाझुडपात आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे झाडाला रबरी पाइपने गळफास घेतलेल्या अवस्थेत जिम ट्रेनरची बॉडी आढळली आहे. 14 मार्च रोजी पत्नीला जेवण कर, लोणचं आणि भाजी कर.. मी अर्ध्या तासांत येतो असं सांगून गेला तो आलाच नाही. अखेर 14 दिवसांनी त्याचा मृतदेह विचित्र स्थितीत आढळला.

कुटुंबाचा घातपाताचा आरोप 

30 वर्षीय सचिन मच्छिंद्र माने असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. सचिनसोबत घातपात झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. बारा दिवसांपूर्वी कुटुंबियांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल केली होती. एका महिलेसह तिघांवर सचिन मानेच्या घातपाताचा संशय असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

सचिनच्या मागे पत्नी अन् दोन मुले 

मिळालेल्या माहितीनुसार, सचिनच्या पश्चात पत्नी कल्याणी, तीन वर्षांची मुलगी ओजस्वी आणी दीड वर्षांचा मुलगा पार्थ असा परिवार आहे. सचिन हा बॉडी बिल्डर असून त्याचं मोबईलचं दुकान होतं. तसेच तो जिम ट्रेनर देखील होता. सचिन मानेचं असं अचानक गायब होणं आणि मग विचित्र स्थितीत मृतदेह सापडल्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अर्ध्या तासांत येतो सांगून गेला त्यानंतर त्याचा मोबाईल बंद पडला आणि 14 दिवसांनी मृतदेहच सापडला. शुक्रवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास सोलापूर विजापूर रस्त्यावरील सैफुलजवळील एका निर्जन ठिकाणी, सागवानाच्या झाडाला रबरी पाईपने गळफास घेतलेल्या अवस्थेत सचिनचा मृतदेह आढळून आला. जवळच सापडलेला मोबाईल आणि इतर वस्तूंवरून त्याची ओळख पटवण्यात आली, अशी माहिती मिळाली आहे.

नातेवाईकांचा कुणावर आरोप

सचिन यांचा मृत्यू हा आत्महत्या नसून तो घातपात असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. एका महिलेसह तिघांनी मिळून सचिन यांचा घातपात केला असावा, असा दावा नातेवाईकांनी केला. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. प्राथमिक वैद्यकीय अहवालात मृत्यूचे कारण ‘गळफास’ असल्याचे समोर आले असले, तरी पोलीस आता सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें