Search
Close this search box.

मुंबई गाढ झोपेत असताना घडली एक किमया; 24 तासापूर्वीचा व्हिडीओ वारंवार का पाहिला जातोय?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई शहराच्या जन्मापासून ते अगदी आतापर्यंत या शहराचा सर्वांगीण विकास अगदी सर्वच अंगानं झाला. शहरावर ज्यांना वर्चस्व मिळालं, त्यांनीत्यांनी आपआपल्या परिनं शहराच्या विकासामध्ये मोलाचं योगदान दिलं. मागील दोन दशकांच्या कालावधीतच शहराचा चेहरामोहरा इतका बदलला की, एखाद्या परदेशी आणि आधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण असणाऱ्या शहरांना मुंबईकडून चांगलीच टक्कर दिली जाईल असं चित्र पाहायला मिळालं. अशाच या मुंबई शहरात नुकतीच एक अशी घटना किंबहुना एक असं किमायागार काम घडवून आणलं आहे, ज्याची नागरिकांना कल्पनाही नसावी. मात्र, ‘शांतीत क्रांती’ घडली हेसुद्धा तितकंच खरं.

मुंबईत असं घडलंय काय? जाणून घ्या…

मुंबईत सध्या प्रवासाच्या माध्यमातून हे शहर जवळ आणण्यासाठी रेल्वे स्तानकं, बस थांबे, व्यावसायिक केंद्र यांची जोडणी मेट्रो मार्गानं करण्यावर भर दिला जात असून त्याच प्रवासात एक मोठा टप्पा गाठण्यात आला आहे. MMRDA नं यामध्ये मोलाची भूमिका बजावत त्याचसंदर्भातील एका महत्त्वाच्या प्रगतीशील टप्प्याची माहिती सर्वांसमोर आणली आहे. सध्या ही माहिती देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून तो इतका कमाल आहे की वारंवार पाहिलासुद्धा जात आहे.

https://x.com/MMRDAOfficial/status/2017885033944785194?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2017885033944785194%7Ctwgr%5E694c5ad6556d7738b5163c6ae2f6e4391763472f%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fmarathi%2Fmumbai%2Fmumbai-news-metro-line-4-massive-steel-spans-launched-at-bhandup-west%2F980947

मुंबई शहर गाढ झोपेत असतानाच…

सतत घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबई रात्रीच्या अंधारात काहीशी विश्रांती घेत असतानाच मेट्रो मार्गिका 4 ने एक महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला. भांडुप पश्चिम इथं कैक कौशल्यवान मंडळींच्या प्रयत्नांनी तब्बल 325 मेट्रिक टन वजनाचे 3 प्रचंड आकारेच स्टील स्पॅन यशस्वीरीत्या लॉन्च करण्यात आले. अधिकृत माहितीनुसार 8 हेवी ड्युटी क्रेन आणि 12 मल्टी-अ‍ॅक्सल वाहनांच्या मदतीनं हे स्टील स्पॅन अतिशय कौशल्याने बसवण्यात आले.

मेट्रो मार्गिकेतील महत्त्वाचा टप्पा समजल्या जाणाऱ्या या स्टील स्पॅनच्या यशस्वी उभारणीमुळे मेट्रो मार्गिका 4 च्या बांधकामातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आल्यानं आता हे काम बरंच पुढेही गेल्याची माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून समोर येणार आहे.

कोणकोण कामाला लागलं? 

स्पॅन बसवण्याच्या कामासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), बेस्ट, भांडुप वाहतूक पोलीस, भांडुप पोलीस शिवाय परिसरातील रहिवाशांसह दुकानदार यांच्यासोबत एमएमआरडीएने समन्वय साधला आणि चार रात्री खर्चून होणारं हे काम अवघ्या दोन रात्ररींमध्ये पूर्ण केवं. यासाठी 35 इंजिनिअर, 100 हून अधक कामगार, 70 वाहतूक वॉर्डन,  25 हून अधिक पोलीसांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं. सदर प्रक्रियेदरम्यान नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची विशेष काळजी घेण्यात आली होती.

admin
Author: admin

और पढ़ें