2026 मध्ये पहिला भयानक रेल्वे अपघात घडला आहे. धानत्या ट्रेनवर क्रेन पडली आहे. या अपघातात एकावेळी 22 जणांचा मृत्यू झाली आहे. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. थायलंडमध्ये हा मोठा रेल्वे अपघातात झाला आहे.
क्रेन कोसळल्याने ट्रेन रुळावरून घसरली. ही ट्रेन थायलंडची राजधानी ते देशाच्या ईशान्य भागात जात होती. बुधवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता बँकॉकच्या ईशान्येला 230 किमी अंतरावर असलेल्या रत्चासिमा प्रांतातील सिखिओ जिल्ह्यात हा अपघात झाला. स्थानिक पोलिस आणि बचाव पथके घटनास्थळी मदतकार्य करत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातस्थळी हाय-स्पीड ट्रेन लाईनचे बांधकाम सुरू होते. यावेळी ही मोठी दुर्घटना घडली. बँकॉकच्या दिशेने ट्रेन येत होती. यावेळी बांधकाम क्रेन ट्रेनवर थेट पडली. क्रेन पडल्याने ट्रेन रुळावरून घसरली आणि तिच्या काही डब्यांना आग लागली. पोलिसांनी सांगितले की आग आटोक्यात आणण्यात आली आहे आणि बचाव कार्य सुरू आहे.
थायलंड पोलिसांनी एका निवेदनात 22 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. या अपघातात 79 जण जखमी झाले आहेत, त्यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. थायलंड रेल्वेने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रेनमध्ये 195 जण प्रवासी ही संख्या बसण्याच्या नियोजनावर आधारित आहे. खरी संख्या वेगळी असू शकते. थायलंडचे उपपंतप्रधान आणि वाहतूक मंत्री पिपट रत्चाकिप्रकर्ण यांनी अपघाताच्या कारणाची संपूर्ण आणि व्यापक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
बुधवारी सकाळी राजधानी बँकॉकपासून सुमारे 230 किलोमीटर ईशान्येला असलेल्या सिखिओ जिल्ह्यात हा अपघात झाला. प्रवासी ट्रेन उबोन रत्चाथानी प्रांताकडे जात होती. स्थानिक माध्यमांच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये घटनास्थळी बचाव कर्मचारी दिसत आहेत. रंगीबेरंगी प्रवासी ट्रेन रुळावरून घसरून उलटली होती, ढिगाऱ्यातून धूर येत होता. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे आणि बचाव कार्य सुरू आहे.
नाखोन रत्चासिमा जनसंपर्क विभागाने सोशल मिडियाद्वारे मदत कार्याची माहिती दिली. ढिगाऱ्यातून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचाव आणि मदत कार्य सध्या सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बँकॉकहून उबोन रत्चाथिनी प्रांताकडे जाणाऱ्या एका चालत्या ट्रेनवर एलिव्हेटेड हाय-स्पीड रेल्वे बांधण्यासाठी वापरण्यात येणारी क्रेन पडली, ज्यामुळे ट्रेन रुळावरून घसरली आणि तिला आग लागली. नाखोन रत्चासिमा जनसंपर्क विभागाच्या म्हणण्यानुसार, आग आटोक्यात आणण्यात आली आहे आणि बचाव कर्मचारी आत अडकलेल्यांचा शोध घेत आहेत.









