Search
Close this search box.

घसरणीनंतर पुन्हा महागले सोनं, ऐन लग्नसराईच्या दिवसांत उच्चांकी दरवाढ, वाचा 24 कॅरेटचे दर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरणाऱ्या सोन्याच्या दरांनी आज अचानक उसळी घेतली आहे. दिवाळीनंतर सोन्याचे दर घसरले होते. मात्र आता  सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उच्चांकी दर गाठला आहे.

सकारात्मक आंतरराष्ट्रीय संकेत यादरम्यान मंगळवारी 11 नोव्हेंबर रोजी सोनं आणि चांदीच्या दरात मोठी उसळी घेतली आहे. 11 नोव्हेंबर रोजी सोनं आणि चांदीच्या भावात मोठी उसळी घेतली आहे. एमसीएक्स व मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दराने 1 टक्क्यांहून अधिक तर चांदीने 1.2 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे. तर, दुसरीकडे देशांतर्गंत सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी तेजी दिसून आली आहे.

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 2,460 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,26,280रुपयांवर पोहोचले आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 2,250 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा 1,15,750 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 1,840 रुपयांची वाढ झाली असून 94,710 रुपयांवर स्थिरावले आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?

– 10 ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,15,750 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,26,280 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 94,710 रुपये

– 1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 11,575 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 12,628 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 9,471 रुपये

– 8 ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 92,600 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 1,01,024 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 75,768 रुपये

– मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर? (Today Gold Rate in Mumbai Pune)

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,15,750 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,26,280 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 94,710 रुपये

admin
Author: admin

और पढ़ें