Search
Close this search box.

IPS अधिकाऱ्याची आत्महत्या, IAS पत्नी मुख्यमंत्र्यांसह जपान दौऱ्यावर असताना डोक्यात गोळी झाडली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

हरियाणा कॅडरचे सीनियर आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार (Y Puran Kumar) यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या (IPS Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंढीगड सेक्टर 11 मधील सरकारी निवासस्थानी त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. पूरन कुमार हे हरियाणामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक रँकचे (Haryana ADGP Rank Officer) अधिकारी होते. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.

वाय पूरन कुमार हे 2001 बॅचचे IPS अधिकारी (2001 Batch IPS Officer) होते. आपल्या प्रामाणिकपणा आणि मेहनतीमुळे त्यांची ओळख पोलीस विभागात एक कुशल अधिकारी अशी होती. पोलिसांना घटनास्थळावरून एक पिस्तूल (Pistol) मिळाले आहे. मात्र, आत्महत्येचे कारण (Reason) अद्याप स्पष्ट झालेले नाही.

IPS Y Puran Kumar Suicide : पत्नी IAS अधिकारी, सध्या जपान दौऱ्यावर

पूरन कुमार यांच्या पत्नी अमनीत पी कुमार (Amneet P Kumar IAS) या आयएएस अधिकारी आहे. सध्या त्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या शिष्टमंडळात असून जपानच्या दौऱ्यावर आहेत. अशा वेळी पूरन कुमार यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंदीगड पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम (Forensic Team) प्रत्येक अँगलने तपास करत आहे.

Haryana Y Puran Kumar Suicide : रक्ताच्या थारोळात मृतदेह

मंगळवारी दुपारी वाय. पूरण कुमार यांचा मृतदेह त्यांच्या घराच्या बेसमेंटमध्ये (Basement) आढळला. सर्वप्रथम त्यांच्या मुलीने रक्ताने माखलेले शरीर पाहिले आणि तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच, चंदीगड पोलीस (Chandigarh Police) घटनास्थळी दाखल झाली आणि फॉरेन्सिक टीम (CFSL Team) ला तपासासाठी बोलावले गेले. मृतदेहाला सेक्टर 16 मधील रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले.

Y Puran Kumar Posting Details : सध्या कुठे कार्यरत होते?

आयपीएस अधिकारी वाय. पूरण कुमार हे सध्या सुनारिया येथीलपोलिस ट्रेनिंग कॉलेजमध्ये (Police Training College Sunaria Rohtak) कार्यरत होते.

admin
Author: admin

और पढ़ें