Search
Close this search box.

मुंबईत 27 वर्षीय डॉक्टरने उचलले टोकाचे पाऊल, इंजेक्शन घेऊन संपवले आयुष्य

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

केईएम रूग्णालयाच्या डॉक्टरबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील पालिकेच्या सर्वात मोठ्या रूग्णालयातील एका निवासी डॉक्टरने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. २७ वर्षीय डॉ. आदिनाथ पाटीलची शिवडीच्या टीबी रूग्णालयात रात्री इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. आदिनाथ मेडिसिन विभागाच्या पहिल्या वर्षात पदव्युत्तर शिक्षण घेत होता. आदिनाथ जळगावचा असून त्याचे वडिलही डॅाक्टर आहेत. केईएम रूग्णालयातील मेडिसिन विभाग दुरूस्तीच्या कारणास्तव शिवडी टीबी रुग्णालयात हलवण्यात आलाय. परंतु शिवडी रूग्णालयात सोयीसुविधा नसल्याने निवासी डॅाक्टरांना मनस्ताप सहन करावा लागत होता.

admin
Author: admin

और पढ़ें