Search
Close this search box.

अखेर शोध लागला पण…; Titan पाणबुडीतील सर्व प्रवाशांचा मृत्यू, अवशेष पाहून धडकी भरेल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

टायटॅनिक (Titanic ) जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या आणि प्रवासाच्या सुरुवातीच्या 45 व्या मिनिटापासूनच संपर्क तुटलेल्या टायटन या पाणबुडीबाबतची मोठी अपडेट रॉयटर्सनं प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये 18 जून रोजी OceanGate या कंपनीच्या टायटन पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कंपनीकडूनही या वृत्ताला दुजोरा देत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून, त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.

संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्य़ा या घटनेला आता एक हळहळणारं वळण मिळालं असून, अमेरिकन तटरक्षक दलाच्या माहितीनुसार catastrophic implosion मुळं पाणबुडीचं नुकसान झालं असून, यातच पाचही प्रवाशांचा मृत्यू ओढावल्याची माहिती मिळत आहे.

कसा घेतला शोध?
कॅनडाच्या एका जहाजाशी जोडल्या गेलेल्या एका यंत्रमानवी उपकरणाच्या मदतीनं पाणबुडीच्या अपघातग्रस्त अवशेषांचा शोध सालण्यात आला. गुरुवारीच यासंदर्भातील माहिती समोर आली. समुद्रतळाशी साधारण 1600 फूट (488 मीटर) खोलवर टायटॅनिक जहाजाच्या एका टोकापासूनच काही अंतरावर अटलांटिक महासागराच्या उत्तरेला असणाऱ्या एका कोपऱ्यात या पाणबुडीचे अवशेष सापडले.

पाणबुडीचे पाच भाग या शोधमोहिमेत सापडल्याची अधिकृत माहिती सध्या मिळत असून, त्यामध्ये या 22 फूटांच्या पाणबुडीचे दोन तुकडे झाल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय यामध्ये प्रवास करणाऱ्या कोणत्याही प्रवाशासंदर्भातील माहिती किंवा अवशेष मात्र सापडू शकलेले नाहीत. दरम्यान, पाणबुडी आदळल्यामुळं ही दुर्घटना ओढावल्याची माहिती संबंधित शोधपथकाशी संबंधित अधिकारी देत आहेत.

समुद्रात लुप्त झाले ते पाचजण…
दरम्यान, अमेरिकन तटरक्षक दलानं पत्रकार परिषद घेत सदरील अपघाताची माहिती देण्यापूर्वीच पाणबुडीच्या ओशनगेट या कंपनीकडून प्रवाशांपैकी कुणीही हयात असल्याची आशा नसल्याचं म्हणत एक पत्रक जारी करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. या पाणबुडीमध्ये कंपनीचे संस्थापक आणि का CEO Stockton Rush यांच्यासह ब्रिटीश अब्जाधीश हामिश हार्डिंग, पाकिस्तानशी पाळंमुळं जोडलेले व्यावसायिक शहजादा दावूद आणि त्यांचा मुलगा सुलेमान आणि फ्रेंच oceanographer पॉल हेन्री नार्गोलेट यांचा समावेश होता.

विविध देशांच्या अनेक बचाव पथकांनी या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी गेल्या चार ते पाच दिवसांपासून शोधमोहिमा राबवल्या होत्या. यामध्ये खोल समुद्रात पाणबुडी शोधण्यासाठी विमानं आणि मोठ्या जहाजांची मदत घेण्यात आली होती. आता या पाणबुडीच्या अवशेषांचं संशोधन झाल्यानंतर नेमकी कोणती माहिती समोर येते याकडेच संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे.

admin
Author: admin

और पढ़ें

अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल (Amravati Paratwada Case)आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अयानने आपल्या चैनीसाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून (Amravati Paratwada Case) विकला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या सोशल मीडिया रिल्समधे जे नोटांचे बंडल दिसायचे, ते प्रत्यक्षात आईचे दागिने विकून मिळालेले पैसे होते. अयानला महागड्या हॉटेल्समध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे अशा विलासी सवयी होत्या, त्यासाठी त्याने आपल्या आईचे दागिने चोरल्याचं आणि विकल्याचं समोर आलं आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा… अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानचा (Amravati Paratwada Case) भयान चेहरा आता समोर आला आहे. पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा एक हार चोरून विकला होता. अयानच्या रिल्स मध्ये असलेले नोटांचे बंडल आईचं मंगळसूत्र चोरून विकून मिळालेल्या पैशाचे होते अशी माहिती समोर आली आहे. हॉटेलमध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे यांचा अयानला छंद होता. यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि मग त्याने आईचं मंगळसूत्र ही चोरून विकलं अशी माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : आयनचा थार अन् चार iPhone चा व्हिडीओ व्हायरल, ती कार कोणाची? अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये तो ‘थार’  (Thar) कारमध्ये बसलेला आहे, त्याच्याकडे चार आयफोन आहेत, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ती गाडी कोणाची? गाडीचे मालक कोण आहेत? आणि त्या व्हिडिओमागील सत्य काय आहे?, याची माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) अयान ज्या काळ्या रंगाच्या थार गाडीत (MH 27 DL 3111) व्हिडिओ बनवताना दिसला, ती गाडी परतवाडा येथील राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची आहे. राजेश प्रजापती यांचे तिथे ‘संजय ऑटो पार्ट्स’ नावाचे दुकान आहे. राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आणि अयानची ओळख OLX वरून झाली होती. आर्यनला अयानकडून एक मोबाईल घ्यायचा होता, त्या संदर्भात त्यांची भेट झाली होती. अयानने आर्यनला सांगितले की तो एक ‘रील क्रिएटर’ असून त्याचे १८,००० फॉलोअर्स आहेत. त्याने आर्यनला विनंती केली की त्याला गाडीसोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे. ओळखीच्या नात्याने आर्यनने त्याला गाडीत व्हिडिओ बनवू दिला. तर अयानच्या रीलमध्ये दिसणारी बंदूक ही शिकारीची किंवा खरी बंदूक नसून ती शेतात जनावरांना पळवण्यासाठी वापरली जाणारी ‘एअर गन’ (Air Gun) असल्याचा दावा आर्यनने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजेश आणि आर्यन प्रजापती यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.