Search
Close this search box.

CBI शाहरुखचा जबाब नोंदवणार; समीर वानखेडे खंडणी प्रकरणात मोठी Update!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या कथित खंडणी भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय (CBI) आता बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shahrukh Khan) जबाब नोंदवणार आहे. सीबीआय शाहरुख खान आणि आर्यन खानचा (Aryan Khan) जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टाने समीर वानखेडे यांना 23 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे.

कथित खंडणी प्रकरणातील अनेकांचा जबाब नोंदवण्यात आले आहेत. मात्र आता खान पिता-पुत्राचे जबाब नोंदवल्यास खंडणी आरोपांबाबत अधिक स्पष्टता येईल अशी सीबीआय सूत्रांची माहिती आहे. दरम्यान अद्याप जबाब नोंदवण्याची तारीख वेळ निश्चित नाही असं समजत आहे.

“आम्ही लवकरच एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्या आर्यन खानचा जबाब नोंदवणार आहोत. याशिवाय आरोपी किरण गोसावी आणि डिसूजा यांनी वानखेडेंच्या वतीने 25 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी शाहरुख खानचाही जबाब नोंदवणार आहोत. जर कटाच्या मुळापर्यंत जायचं असेल तर जबाब नोंदवणं आवश्यक आहे,” असं एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं आहे.

गेल्या महिन्यात सीबीआयने समीर वानखेडे कथित लाच प्रकरणाची थोडक्यात चौकशी केली होती. या प्रकरणात वानखेडेंची सविस्तर चौकशी करण्यासाठी सीबीआय कोर्टाच्या आदेशाची वाट पाहत आहे.

हे संपूर्ण प्रकरण ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईत घडलेल्या क्रूझ शिप रेडशी संबंधित आहे. या रेडमध्ये काही हायप्रोफाईल व्यक्तींसह अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खानकडे काही प्रमाणात ड्रग्ज सापडल्याचे आरोप होते. या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व NCB चे तत्कालीन झोनल प्रमुख समीर वानखेडे यांनी केले होते.

आर्यनवर ड्रग्ज तस्कर आणि आंतरराष्ट्रीय समूहांशी संबंध असल्याचे आरोप करण्यात आले होते. परंतु, 25 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर जामीन मिळाला होता. यानंतरच आर्यन खानला मुद्दाम टार्गेट करून लाच मागण्यात आली असे आरोप करण्यात आले होते. समीर वानखेडे यांनीच कथितरित्या शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांची खंडणी मागितली असा दावा करण्यात आला. त्याचाच सीबीआयकडून सध्या तपास सुरू आहे.

सीबीआयने 11 मे रोजी वानखेडे, एनसीबीचे माजी पोलीस अधीक्षक विश्व विजय सिंह, गुप्तचर अधिकारी आशिष रंजन आणि गोसावी आणि डिसोझा यांच्याविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला होता. एनसीबीचे उपमहासंचालक (डीडीजी) ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखालील विशेष चौकशी पथकाने आरोप केला होता की, खानच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपये उकळण्याचा कट रचण्यात आला होता. आणि ही रक्कम नंतर 18 कोटींवर आणण्यात आली होती. गोसावीने 50 लाखांची टोकन रक्कम घेतली होती. परंतु या रकमेचा काही भाग नंतर परत करण्यात आला.

admin
Author: admin

और पढ़ें

अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल (Amravati Paratwada Case)आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अयानने आपल्या चैनीसाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून (Amravati Paratwada Case) विकला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या सोशल मीडिया रिल्समधे जे नोटांचे बंडल दिसायचे, ते प्रत्यक्षात आईचे दागिने विकून मिळालेले पैसे होते. अयानला महागड्या हॉटेल्समध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे अशा विलासी सवयी होत्या, त्यासाठी त्याने आपल्या आईचे दागिने चोरल्याचं आणि विकल्याचं समोर आलं आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा… अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानचा (Amravati Paratwada Case) भयान चेहरा आता समोर आला आहे. पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा एक हार चोरून विकला होता. अयानच्या रिल्स मध्ये असलेले नोटांचे बंडल आईचं मंगळसूत्र चोरून विकून मिळालेल्या पैशाचे होते अशी माहिती समोर आली आहे. हॉटेलमध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे यांचा अयानला छंद होता. यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि मग त्याने आईचं मंगळसूत्र ही चोरून विकलं अशी माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : आयनचा थार अन् चार iPhone चा व्हिडीओ व्हायरल, ती कार कोणाची? अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये तो ‘थार’  (Thar) कारमध्ये बसलेला आहे, त्याच्याकडे चार आयफोन आहेत, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ती गाडी कोणाची? गाडीचे मालक कोण आहेत? आणि त्या व्हिडिओमागील सत्य काय आहे?, याची माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) अयान ज्या काळ्या रंगाच्या थार गाडीत (MH 27 DL 3111) व्हिडिओ बनवताना दिसला, ती गाडी परतवाडा येथील राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची आहे. राजेश प्रजापती यांचे तिथे ‘संजय ऑटो पार्ट्स’ नावाचे दुकान आहे. राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आणि अयानची ओळख OLX वरून झाली होती. आर्यनला अयानकडून एक मोबाईल घ्यायचा होता, त्या संदर्भात त्यांची भेट झाली होती. अयानने आर्यनला सांगितले की तो एक ‘रील क्रिएटर’ असून त्याचे १८,००० फॉलोअर्स आहेत. त्याने आर्यनला विनंती केली की त्याला गाडीसोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे. ओळखीच्या नात्याने आर्यनने त्याला गाडीत व्हिडिओ बनवू दिला. तर अयानच्या रीलमध्ये दिसणारी बंदूक ही शिकारीची किंवा खरी बंदूक नसून ती शेतात जनावरांना पळवण्यासाठी वापरली जाणारी ‘एअर गन’ (Air Gun) असल्याचा दावा आर्यनने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजेश आणि आर्यन प्रजापती यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.