Search
Close this search box.

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सरकारची धावपळ, तातडीच्या बैठकीनंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मराठा आरक्षणासंबंधी (Maratha Reservation) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी बैठकीत चर्चेत आलेले मुद्दे माध्यमांसमोर मांडले. ओपन कोर्टमध्ये आमचं मत ऐकून घ्यावं, असं आमचं मत होतं. मात्र, चेंबरमध्ये पुर्नविचार याचिका (Review Petition) रद्द करण्यात आली. आता मराठा समाजाचं मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी पुन्हा आयोग स्थापन करणार असल्याची माहिती देखील देसाई यांनी यावेळी दिली आहे.

सखोल सॅम्पल सर्वे करणार असल्याचं देखील देसाई यांनी यावेळी सांगितलं. सरकार क्युरेटीव्ह पेटीशन (Curative Petition) दाखल करणार असल्याची घोषणा बैठकीत करण्यात झाली. राज्य शासन हे आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाम आहे, त्यासाठी अधिक मजबूत कायदेशीर लढा लढण्यात येईल, मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत, असं शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितलं.

बार्टी योजना सारथीला लागू करण्यात येणार आहे. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी विस्तृत सर्वे करावा लागेल, त्यावर काम करणारी संस्था ही सुद्धा निष्पक्ष, कार्यक्षम असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच प्रत्येक कॅबिनेट बैठकीआधी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होणार आहे. गेल्या सरकारडून राहिलेल्या त्रुटी यावेळी राहू देणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. मराठा समाजाला गृहित धरु नये असं याचिकाकर्ते विनोद पाटलांनी म्हटलंय, तर सरकारनं आता वेळ काढूपणाचे कुठलेही निर्णय घेऊ नयेत अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी दिलीय.

admin
Author: admin

और पढ़ें

अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल (Amravati Paratwada Case)आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अयानने आपल्या चैनीसाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून (Amravati Paratwada Case) विकला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या सोशल मीडिया रिल्समधे जे नोटांचे बंडल दिसायचे, ते प्रत्यक्षात आईचे दागिने विकून मिळालेले पैसे होते. अयानला महागड्या हॉटेल्समध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे अशा विलासी सवयी होत्या, त्यासाठी त्याने आपल्या आईचे दागिने चोरल्याचं आणि विकल्याचं समोर आलं आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा… अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानचा (Amravati Paratwada Case) भयान चेहरा आता समोर आला आहे. पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा एक हार चोरून विकला होता. अयानच्या रिल्स मध्ये असलेले नोटांचे बंडल आईचं मंगळसूत्र चोरून विकून मिळालेल्या पैशाचे होते अशी माहिती समोर आली आहे. हॉटेलमध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे यांचा अयानला छंद होता. यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि मग त्याने आईचं मंगळसूत्र ही चोरून विकलं अशी माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) Amravati Video Viral : आयनचा थार अन् चार iPhone चा व्हिडीओ व्हायरल, ती कार कोणाची? अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये तो ‘थार’  (Thar) कारमध्ये बसलेला आहे, त्याच्याकडे चार आयफोन आहेत, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ती गाडी कोणाची? गाडीचे मालक कोण आहेत? आणि त्या व्हिडिओमागील सत्य काय आहे?, याची माहिती समोर आली आहे.(Amravati Paratwada Case) अयान ज्या काळ्या रंगाच्या थार गाडीत (MH 27 DL 3111) व्हिडिओ बनवताना दिसला, ती गाडी परतवाडा येथील राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची आहे. राजेश प्रजापती यांचे तिथे ‘संजय ऑटो पार्ट्स’ नावाचे दुकान आहे. राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची आणि अयानची ओळख OLX वरून झाली होती. आर्यनला अयानकडून एक मोबाईल घ्यायचा होता, त्या संदर्भात त्यांची भेट झाली होती. अयानने आर्यनला सांगितले की तो एक ‘रील क्रिएटर’ असून त्याचे १८,००० फॉलोअर्स आहेत. त्याने आर्यनला विनंती केली की त्याला गाडीसोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे. ओळखीच्या नात्याने आर्यनने त्याला गाडीत व्हिडिओ बनवू दिला. तर अयानच्या रीलमध्ये दिसणारी बंदूक ही शिकारीची किंवा खरी बंदूक नसून ती शेतात जनावरांना पळवण्यासाठी वापरली जाणारी ‘एअर गन’ (Air Gun) असल्याचा दावा आर्यनने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजेश आणि आर्यन प्रजापती यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.