Search
Close this search box.

रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी, तरुणाला अटक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( President Rajya Mahila Ayog Rupali chakankar ) यांना एका तरुणाकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी देणाऱ्या तरुणाला सिंहगड रस्ता पोलिसांनी ( Sinhgad police ) ताब्यात घेतलं आहे.

भाऊसाहेब नारायण शिंदे ( रा. भेंडा, तालुका नेवासे, जिल्हा : अहमदनगर) असे या आरोपीचे नाव असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भाऊसाहेब नारायण शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली चाकणकर यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांचे बंधू संतोष बोराटे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

admin
Author: admin

और पढ़ें