Search
Close this search box.

Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर जोशीमठजवळ कोसळले, वैमानिकासह सहाजणांचा अपघात; शोधमोहीम सुरू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धामवरून परतणाऱ्या एका हेलिकॉप्टरचा खराब हवामानामुळे भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बद्रीनाथ येथून डेहराडूनच्या सहस्रधाराकडे उड्डाण केलेले ‘ट्रान्स भारत’ (Trans Bharat) कंपनीचे हेलिकॉप्टर जोशीमठ परिसरातील चाई गावावरील लष्करी छावणीजवळ (Army Camp) कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

या हेलिकॉप्टरमधून वैमानिकासह (Pilot) एकूण 6 जण (5 प्रवासी आणि 1 पायलट) प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ (SDRF), जिल्हा प्रशासन आणि आयटीबीपी (ITBP) च्या तुकड्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असून तातडीने बचावकार्य सुरू केले आहे.

Helicopter Passengers Identity : विमानात असलेल्या प्रवाशांची नावे

उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणाच्या (UCADA) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरचा संपर्क तुटल्यानंतर त्याचे लोकेशन चाई गावाच्या वर असलेल्या आर्मी कॅम्पजवळ दिसून आले आहे. या अपघाग्रस्त हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांची नावे स्पष्ट झाली आहेत.
चंद्रकांत

CM Pushkar Singh Dhami Reaction : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून चौकशीचे आदेश

या दुर्दैवी अपघातावर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत मुख्यमंत्री धामी म्हणाले, “चाई गाव, जोशीमठजवळ हेलिकॉप्टर अपघाताची अत्यंत दुर्दैवी माहिती मिळाली आहे. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि SDRF द्वारे संयुक्तपणे बचावकार्य (Rescue Operation) चालवले जात आहे. मी स्वतः या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहे. गंभीर जखमींना तातडीने एअरलिफ्ट करून उच्च वैद्यकीय उपचारासाठी हलवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व प्रवासी सुरक्षित राहावेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.”

Bad Weather Warning : खराब हवामान अन् ऑरेंज अलर्ट ठरले कारणीभूत

उत्तराखंडमध्ये सध्या हवामान अत्यंत खराब असून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने (IMD) 29 ऑक्टोबर रोजीच 30 ऑक्टोबरसाठी चमोली, नैनीताल, चंपावत, पिथौरागढ आणि बागेश्वर जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला होता. पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह, गारांचा पाऊस आणि 40 ते 50 किमी प्रति तास तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या अत्यंत खराब आणि धुक्याच्या हवामानामुळेच हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

admin
Author: admin

और पढ़ें

Bhutan Glacial Lake Burst: भूतानमध्येही ‘नेपाळी’ थरकाप! हिमनदीचे सरोवर फुटताच प्रचंड विध्वंस, महामार्ग आणि रस्ते उखडले, प्रसिद्ध गरम पाण्याचा झरा सुद्धा वाहून गेला, भारतात बंगाल आणि आसाममध्ये पुराचा इशारा

Bhutan Glacial Lake Burst: भूतानमध्येही ‘नेपाळी’ थरकाप! हिमनदीचे सरोवर फुटताच प्रचंड विध्वंस, महामार्ग आणि रस्ते उखडले, प्रसिद्ध गरम पाण्याचा झरा सुद्धा वाहून गेला, भारतात बंगाल आणि आसाममध्ये पुराचा इशारा