Search
Close this search box.

प्रवाशांसाठी मोठी बातमी! ‘या’ 6 स्टेशनवर लोकल येणारच नाही, 14 ते 16 ऑक्टोबरदरम्यान ‘मरे’वर मेगाब्लॉक, एक्स्प्रेसच्या वेळा बदलल्या

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कसारा रेल्वे स्थानकातील यार्ड विस्तारीकरणाच्या कामामुळे 14 ते 16 ऑक्टोबरदरम्यान मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यान अनेक एक्स्प्रेसच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत तर लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कसं असेल मेगाब्लॉकचं नियोजन जाणून घेऊयात.

आसनगाव ते कसारा दरम्यान तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू असल्याने मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने हाती घेतलेल्या कामांमुळे सलग तीन दिवस प्रवाशांचे हाल होणार आहेत. कसारा ते आसनगाव दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. मुंबईहून कसाराकडे येणाऱ्या आणि कसाराहून सुटणाऱ्या बहुतांश लोकल गाड्या आसनगावपर्यंतच धावणार आहेत. त्यामुळं प्रवाशांना पर्यायी व्यवस्थेचा आधार घ्यावा लागणार आहे.

-14 ऑक्टोबरला दुपारी 3.35 ते रात्री 8.35,
-15 ऑक्टोबरला दुपारी 3.35 ते सायंकाळी 7.35

-16 ऑक्टोबरला पहाटे 3 ते सकाळी 6 आणि दुपारी 3.35 ते सायंकाळी 7.35 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

कसारा-खर्डी आणि उंबरमाळी-कसारादरम्यान अप मार्गावर हा ब्लॉक असेल. त्यामुळे या कालावधीत आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद राहील.

ब्लॉकच्या काळात सीएएसएमटी-हावडा दुरांतो एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर एलटीटी-गोरखपूर, एलटीटी-सीतापूरसह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले. काही एक्स्प्रेस गाड्या कल्याण-कर्जत-पुणे-मनमाड या पर्यायी मार्गाने वळवल्या; सणासुदीच्या काळात नाशिककरांच्या प्रवासाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता.

कसं असेल वेळापत्रक?

13 ऑक्टोबरला सुटणारी 12262 हावडा-सीएसएमटी दुरांतो आणि 14 ऑक्टोबरला सुटणारी 12261 सीएसएमटी-हावडा दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. 15 ऑक्टोबरला सीएसएमटी-हावडा दुरांतो सायंकाळी 5.15 ऐवजी 16 ऑक्टोबरला मध्यरात्री 12.20 वाजता सुटेल.

14 ऑक्टोबर रोजी सुटणाऱ्या गाड्या

• गोरखपूर एक्स्प्रेस: सायंकाळी 5.50 वाजता (लोकमान्य टिळक टर्मिनस)
• सीतापूर एक्स्प्रेस: सायंकाळी 5.35 वाजता (लोकमान्य टिळक टर्मिनस)
• धनबाद एक्स्प्रेस: सायंकाळी 6.05 वाजता (लोकमान्य टिळक टर्मिनस)
• कामायनी एक्स्प्रेस: सायंकाळी 5.05 वाजता
• राजगीर एक्स्प्रेस: सायंकाळी 5.20 वाजता
• CSMT-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस: सायंकाळी 5.15 वाजता

15 ऑक्टोबर रोजी सुटणाऱ्या गाड्या

• गोरखपूर एक्स्प्रेस: सायंकाळी 5.35 वाजता (लोकमान्य टिळक टर्मिनस)
• राणी कमलापती एक्स्प्रेस: सायंकाळी 5.50 वाजता (लोकमान्य टिळक टर्मिनस)
• छपरा एक्स्प्रेस: सायंकाळी 6.05 वाजता (लोकमान्य टिळक टर्मिनस)
• कामायनी एक्स्प्रेस: सायंकाळी 5.05 वाजता
• राजगीर एक्स्प्रेस: सायंकाळी 5.20 वाजता
• CSMT-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस: सायंकाळी 5.15 वाजता

admin
Author: admin

और पढ़ें