Search
Close this search box.

Mumbai Tree cutting: मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.  मुंबई महापालिकेच्या एस वॉर्डकडून झाड तोडल्या जाणाऱ्या प्रत्येक झाडांवर नोटीस लावण्यात आली आहे. नाहूर ऐरोली रस्त्यावर गोरेगाव मुलुंड लिंक रोडच्या पुलासाठी तेराशे झाडं तोडली जाणार आहेत. मुंबईतील वाहतूक कोंडीच्या समस्येवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने गोरेगाव – मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर) प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. (Mumbai Tree cutting news)

या कामादरम्यान तब्बल 1 हजार 352 झाडे बाधित होणार असून मोठ्या प्रमाणात झाडे कापण्यात येणार आहेत. या वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींकडून विरोध होत असून संबंधित प्रस्ताव तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, अशा असताना सुद्धा हा प्रस्ताव महापालिकेकडून मंजूर झाल्यानंतर या झाडांवर आता नोटीस लावण्यात आली आहेत.

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव – ऐरोली टोलनाका, मुलुंड या प्रस्तावित जीएमएलआरच्या टप्पा-४ अंतर्गत पूर्व द्रुतगती महामार्ग आणि जीएमएलआर जंक्शनच्या सुधारणा कामासाठी 1352 झाडे तोडण्याचा, तर 1300 झाडांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतला असून विकासाच्या नावाखाली एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करू नये, अशी मागणी केली जात होती. वृक्षतोड आणि पुनर्रोपणासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. मात्र, प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर थेट आता या झाडांवर नोटीस लावण्यात आले आहेत आणि लवकरच या ठिकाणी वृक्षतोड करून या रस्त्याचे काम केले जाणार असल्याची माहिती आहे

काही दिवसांपूर्वीच कोस्टल रोड उत्तर प्रकल्पाच्या इंटरचेंज आणि दुमजली पुलाच्या कामासाठी वर्सोवा येथील नाना-नानी पार्कमधील अनेक जुने वृक्ष पाडण्यात आले होते. या कारवाईला स्थानिकांनी चिपको आंदोलन करत तीव्र विरोध केला होता. मात्र, प्रशासनाने झाडे तोडण्याला न्यायालयाची परवानगी असल्याचे सांगत ही कारवाई रेटून नेली होती. याठिकाणी जवळपास 184 झाडे होती. या झाडांवर अनेक पक्ष्यांची घरटी होती. झाडं तोडल्यानंतर हे पक्षी सैरभर होऊन पार्कमध्ये घिरट्या घालत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Mumbai News: मुंबईतील सर्व मैदाने आणि उद्याने महापालिकेच्याच ताब्यात राहणार

मुंबईतील सर्व मैदाने आणि उद्याने महापालिकेच्याच ताब्यात राहणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. खासगी संस्थांना देखभाल आणि व्यवस्थापनाचे अधिकार देण्यास भाजपचा विरोध; नवीन ओपन स्पेस पॉलिसी लवकरच अंतिम होण्याची शक्यता आहे. मुंबईतील सार्वजनिक मैदाने, उद्याने आणि मोकळ्या जागा खासगी संस्थांना देखभालीसाठी देण्यास भाजपने विरोध दर्शवला आहे. भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्व मैदाने महापालिकेनेच सांभाळण्यावर एकमत झाले.  भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनानुसार हा निर्णय घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, महापालिकेची ओपन स्पेस पॉलिसी गेल्या जवळपास दशकभरापासून प्रलंबित आहे. आता भाजपच्या भूमिकेनंतर नवीन धोरणाला अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. तसेच प्रत्येक प्रशासकीय विभागात दोन ते तीन मैदाने विकसित करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्याचाही प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला.

admin
Author: admin

और पढ़ें