Search
Close this search box.

एकनाथ शिदेंच्या शिवसेना नेत्याने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरातच संपवलं जीवन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेत्याने आत्महत्या केली असून, एकच खळबळ उडाली आहे. शिवाजीराव शिंदे यांनी राहत्या घरात टोकाचं पाऊल उचललं. ते पक्षाचे माजी तालुकाप्रमुख होते. बीडच्या दादाहरी वडगाव येथील रहिवासी आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात अनेकांना धक्का बसला आहे.

दरम्यान शिवाजीराव शिंदे यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर  थोड्याच वेळात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून आत्महत्येचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

मे महिन्यात झाला होता प्राणघातक हल्ला

परळी शहरात शिवाजीराव शिंदे यांच्या मालकीचं हॉटेल आहे. मे 2026 मध्ये याच हॉटेलमध्ये एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. शिवाजीराव शिंदे हॉटेलमध्ये थांबलेले असताना तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. हॉटेलमधील इतर लोकांनी हल्लेखोर तरुणाला पकडल्याने त्यांचा जीव थोडक्यात वाचला होता.

यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सुरवसे नावाचा मुलगा आहे. त्याची माझी ओळख देखील नाही. मात्र, त्याचा आणि माझ्या मुलाचा काहीतरी वाद झाल्याचे समजले. त्याने माझ्या घरासमोर येऊन सर्वांदेखत शिवीगाळ केली. माझ्या हातापायावर अनेक वार करण्यात आले आहेत. माझ्या हॉटेलमधील पैसे लुटण्यात आले, असा आरोप त्यावेळी शिवाजीराव शिंदे यांनी केला होता. त्यामुळे या घटनेचा आणि शिवाजीराव शिंदे यांच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का, याची कुजबूज राजकीय वर्तुळात रंगली आहे.  आता पोलीस तपासात शिवाजीराव शिंदे यांच्या आत्महत्येबाबत कोणती माहिती समोर येणार, हे बघावे लागेल.

admin
Author: admin

और पढ़ें