Search
Close this search box.

एफडीएची पुण्यात धडक कारवाई, सर्वात मोठ्या फार्मा कंपनीचा औषध विक्री परवाना रद्द, 11.91 लाखांचा औषध साठा जप्त

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुण्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील सिप्ला कंपनीचा औषध परवाना रद्द करण्यात आला आहे. औषधाच्या पॅकेजिंगवर जाहिरातीत अनियमितता आणि जाहिरातीत परवानगी नसलेला मजकूर यामुळं एफडीएने ही कारवाई केली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने जून 2026मध्ये पुणे जिल्ह्यातील वडकी येथील सिप्लाच्या मुख्य गोदामावर कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान काही औषधाच्या पॅकेजिंगवर “अनालजेसिक व अँटीपायरेटीक” हा परवानगी नसलेला मजकूर जाहिरात करण्यात आल्याचे आढळून आले. अशा प्रकारची जाहिरात औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम, 1940 व नियम 1945 मधील तरतुदींशी विसंगत असल्याचे  एफडीएने म्हटलं आहे. या कारवाईनंतर एफडीएकडून आल्याने ₹11.91 लाख किमतीचा साठा जप्त करण्यात आला होता.

FDAने जूनमध्ये केलेल्या तपासणीत ‘रिएक्टिन प्लस टॅब्लेट्स या शेड्यूल एच’ अर्थात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर मिळणाऱ्या औषधाच्या पॅकेजिंगवर ‘वेदनाहारक आणि तापशामक’ (‘analgesic and antipyretic) असा दावा आढळला. हा दावा आवश्यक परवानगीशिवाय करण्यात आल्याचे FDAने म्हटले आहे. त्यानंतर एफडीएने सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातील वाहतूक आणि वितरण (C&F) युनिटचा औषध विक्री परवाना रद्द केला आहे.

एफडीएच्या कारवाईवर सिप्ला कंपनीने आक्षेप घेतला असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं म्गटलं आहे. सिप्लाने स्पष्ट केले की,एफडीएचा आदेश Cipla Pharma & Life Sciencesच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या C&F गोदामाच्या कामकाजाशी संबंधित आहे आणि हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याचे कंपनीने म्हटले. एफडीएच्या आदेशात त्यांच्या औषधांच्या सुरक्षितता, गुणवत्ता किंवा परिणामकारकतेबाबत कोणताही प्रश्न उपस्थित केलेला नाही. तसेच या कारवाईत रुग्णांच्या सुरक्षिततेशी संबंधित कोणतीही बाब नाही, असं सिप्लाने म्हटलं आहे.

कारणे दाखवा नोटीसनंतर परवाना रद्द

या अनियमिततांनंतर एफडीएने परवानाधारक कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली. कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणाची तपासणी केल्यानंतरही तपासणीत आढळलेल्या त्रुटी आणि रिअॅक्टिन प्लसच्या रिकॉलबाबत दिलेल्या निर्देशांचे पुरेसे पालन झाले नसल्याचे एफडीएच्या निदर्शनास आले.यानंतर वडकी येथील Cipla Pharma & Life Sciences Ltd.च्या C&F युनिटचा औषध विक्री परवाना 27 ऑगस्टपासून रद्द करण्यात आला.

admin
Author: admin

और पढ़ें