Search
Close this search box.

महाराष्ट्र हादरला! नसरापूरची पुनरावृत्ती जुन्नरमध्ये, उसाच्या शेतात नेऊन 10 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करुन हत्या

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महाराष्ट्राला सून्न करणारी घटना जुन्नरमध्ये उघडकीस आली आहे. नसरापूरच्या निर्भयाला न्याय मिळाल्यानंतर कुठेतरी महिला अत्याचारांच्या घटनांना आळा बसेल अशी आशा असतानाच जुन्नरमध्ये हादरवणारी बातमी समोर आली आहे. जुन्नरमध्ये नसरापूरच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शेजारीच राहणाऱ्या एका तरुणाने साडेनऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या ओळखीचा गैरफायदा घेत तिला गावातून बाहेर नेले. त्यानंतर उसाच्या शेताजवळ तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला. बराच वेळ झाला तरी मुलगी सापडत नाही म्हटल्यावर तिच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. अखेर शोध घेऊनही मुलगी सापडत नाही म्हटल्यावर तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि स्थानिक माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पंचनाम्याचे काम पूर्ण केले आहे. या घटनेमुळे पिंपळवंडी परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

जुन्नरच्या पिंपळवंडीत ग्रामस्थांचा रास्तारोको

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, तर या चिमुकलीला न्याय मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. रास्ता रोकोमुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, प्रशासनासमोर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं आव्हान निर्माण झालं आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पिंपळवंडीला जाणार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पिंपळवंडीला जाणार असून पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार असल्याची माहिती समोर येतेय.

admin
Author: admin

और पढ़ें