सोने खरेदीचा विचार करत असाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. सलग काही दिवसांपासून सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली असून, सोने आणि चांदी दोन्हीच्या किमतींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे दागिने किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
24 कॅरेट सोन्यात मोठी घसरण
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात सुमारे 1.18 टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा दर ₹1,42,220 वरून ₹1,40,540 इतका खाली आला आहे. म्हणजेच एका दिवसात तब्बल ₹1,680 ची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर दबावाखाली असून, COMEX वर सोन्याचा भाव 3,991.90 डॉलर प्रति औंस इतका नोंदवला गेला. 4,000 डॉलरचा महत्त्वाचा टप्पा खाली आल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी काहीशी कमी झाल्याचे संकेत मिळत आहेत.
22 आणि 18 कॅरेट सोन्याचेही दर कमी
दागिन्यांसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याच्या दरातही घट झाली आहे. 10 ग्रॅमसाठी कालचा ₹1,31,000 चा दर आज ₹1,30,590 वर आला असून, ₹410 ची घट झाली आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात आणखी मोठी घसरण झाली आहे. काल ₹1,06,665 असलेला 10 ग्रॅमचा दर आज ₹1,05,405 झाला आहे. म्हणजेच एका दिवसात ₹1,260 ची घट झाली आहे.
दागिने खरेदीसाठी योग्य वेळ
22 कॅरेट सोन्याचा दर पुन्हा 1.31 लाख रुपयांच्या खाली आल्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी हा दिलासादायक बदल मानला जात आहे. मेकिंग चार्ज आणि जीएसटी धरूनही ग्राहकांना कालच्या तुलनेत कमी खर्च करावा लागणार आहे. विशेषतः हिऱ्यांचे आणि जडाऊ दागिने खरेदी करणाऱ्यांना या दरकपातीचा अधिक फायदा होऊ शकतो.
चांदीही झाली स्वस्त
सोनेप्रमाणेच चांदीच्या किमतीतही आज मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात COMEX वर चांदीचा दर 0.63 टक्क्यांनी घसरून 55.83 डॉलर प्रति ट्रॉय औंस इतका झाला आहे. देशांतर्गत बाजारात चांदीचा भाव ₹2,20,000 वरून ₹2,15,000 प्रति किलो इतका खाली आला आहे. म्हणजेच एका दिवसात ₹5,000 ची घसरण झाली आहे.








