Search
Close this search box.

‘पवार साहेब आणि ताई…’, NDA सोबत जाण्याबद्दल रोहित पवार स्पष्टच बोलले; ‘मी सत्तेत असलेल्या…’

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नवी दिल्लीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. त्याचप्रमाणे पार्थ पवारांनाही मोदी आणि शरद पवारांच्या भेटीच्या दुसऱ्या दिवशी भेट घेतल्याची माहिती समोर आल्याने विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच दुसरीकडे रोहित पवार यांनी ते एनडीएसोबत जाणार की नाही याबद्दल भाष्य केलं आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे.

भेटीचं कारण काय?

आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मुद्द्यावरुन बोलताना रोहित पवारांनी, “आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होत असेल तर भविष्यात त्यांना अडचण होईल. गृहमंत्र्यांना विनंती आहे की लवकर नोटिफिकेशन काढून गुन्हे मागे घ्यावेत. अन्यथा आम्हाला यासाठी मोठं आंदोलन करावं लागेल. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पवार साहेबांनी मोदी साहेबांची भेट घेतली होती. आंदोलन आणि शेतकऱ्यांचे विषय घेऊन मोदी यांना भेटले होते. काल सुप्रिया ताई यांनी काल अमित शाह यांची भेट घेतली याच कारण देखील ताई यांनी सांगितलं. दिल्लीत रिसेप्शन आहे यासाठी निमंत्रण देण्यासाठी त्या गेल्या होत्या,” असं सांगितलं.

स्वत: एनडीएमध्ये जाणार का?

पुढे बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेतील पक्षांसोबत जाणार का याबद्दल विचारलं असता रोहित पवारांनी, “पवार साहेब आणि ताई एनडीएसोबत जाणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरून काम करणार आहोत,” असं उत्तर दिलं. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांसोबत जाण्यासाठी केवळ रोहित पवार प्रतिकूल असल्याचा दावा यापूर्वीही करण्यात आलेला. याच पार्श्वभूमीवर बोलताना, “राहील प्रश्न माझा तर मी या सत्तेत असलेल्या पक्षाच्या विरोधात लढत आहे. प्रामाणिकपणे मी लढत राहणार. यापुढे देखील मी लढत राहणार. मी माझ्या भूमिकेशी प्रामाणिक आहे त्यामुळे मी एनडीएसोबत जाणार नाही,” असं उत्तर रोहित पवारांनी दिलं.

शिक्षणमंत्री दादा भुसेंचे आभार

“शिक्षणासाठी राज्याला पुरेसा निधी केंद्राकडून दिला जात नाही. शिक्षणासाठी जो निधी दिला जातो, आरोग्यासाठी जो निधी दिला जातो तो रस्त्यांच्या कामासाठी वळवला जातोय. हा मोठा भ्रष्टाचार आहे,” असं रोहित पवारांनी शिक्षणमंत्री दादा भुसेंबद्दल म्हटलं आहे. सध्या निधीबाबत खरी परिस्थिती काय आहे हे सांगितल्यामुळे मी भुसेंचे आभार मानतो, असं म्हटलं आहे.

शिंदेंच्या नगरसेवकाला टोला

शिंदेंचा नगरसेवक रमेश म्हात्रेंबद्दल बोलताना, “मारहाणीच्या व्हिडीओमध्ये 5 किलोचा रजिस्टर घेऊन मारहाण केली होती. तेव्हा तुमची तब्येत खराब नव्हती का? हा जो प्रश्न कोर्टाने विचारला तो योग्यच आहे.  कोर्टाने ज्या पद्धतीने ताशेरे ओढले ते योग्यच आहेत. यापुढे डॉक्टर किंवा इतरांवर कोणी हात उचलणार नाही,” असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

admin
Author: admin

और पढ़ें