Search
Close this search box.

दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये 3 मुलांच्या आईशी दुष्कृत्य; 2 तास बस चलवत 7 KM प्रवास अन्…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राजधानी दिल्लीमध्ये 2012 साली झालेल्या निर्भया प्रकरणाची आठवण करुन देणारा धक्कादायक प्रकार पुन्हा घडला आहे. नवी दिल्लीमध्ये बुधवार आणि गुरुवारच्या मध्यरात्री एका खासगी बसमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना पश्चिम दिल्लीमधील राणी बाग परिसरात घडली असून या प्रकरणामध्ये दिल्ली पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकजण बसचा चालक असून दुसरा कंडक्टर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दोन तास फिरवत होते बस

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता ही विवाहित असून तिला तीन मुलं आहे. पीडितेच्या पतीला क्षयरोगाचा त्रास आहे. ही महिला रात्री एकटी चालत घरी जात असतानाच रिकाम्या बसमधून आलेल्या चालक आणि कंडक्टरने टाईम विचारण्याच्या बहाण्याने तिला बसमध्ये खेचले. बस चालू असताना तिला 2 तासांहून अधिक काळ बांधून ठेवले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या दोघांनी दोन तासामध्ये ही बस सुमारे सात किलोमीटर फिरवली. आपल्या शरीराची भूक भागवून झाल्यानंतर या दोघांनी पीडितेला रात्री दोन वाजण्याच्या सुमारास राणी बाग ते नांगलोईदरम्यानच्या रस्त्यावर बसमधून फेकून दिलं.

…अन् आरोपींना अटक
पीडितेने घरीची परिस्थिती आणि इतर गोष्टींचा विचार करुन रुग्णालयात जाण्याचे टाळले. मात्र नंतर तिने वैद्यकीय तपासणी केली. तिने पोलिसांकडे रितसर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेतल्यानंतर तातडीने तपास सुरु केला. पोलिसांनी घटना घडली त्या ठिकाणावरील सीसीटीव्हींच्या आधारे बसचा क्रमांक शोधून काढला आणि त्यानंतर ते आरोपींपर्यंत पोहोचले. ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोघांनाही अटक करण्यात आली असून बस पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी बस जप्त करुन फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आली आहे. पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आता पोलीस इतर पुरावे गोळा करत असून त्यामध्ये परिस्थितीजन्य पुराव्यांबरोबरच जबाबांचाही समावेश आहे. दिल्लीच्या पोलीस कमिशनने या प्रकरणाचा सर्व दृष्टीकोनातून तपास केला जात असून आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचं सांगितलं.

निर्भया प्रकरणाची आठवण
धावत्या बसमध्ये महिलेवर बलात्कार करण्यात आल्याने या घटनेचा तपशील समोर आल्यानंतर अनेकांना 2012 च्या निर्भया प्रकरणाची आठवण झाली आहे. अनेकांनी निर्भया प्रकरणाला 14 वर्ष होऊन गेल्यानंतरही अशी स्थिती कायम असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.

admin
Author: admin

और पढ़ें