Search
Close this search box.

Pune Crime Nasrapur Case: नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या नसरापूर लैंगिक अत्याचार आणि हत्याप्रकरणामुळे सध्या सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. 1 मे रोजी नसरापूर येथे एका साडेतीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिच्या हत्या (Murder news) करण्यात आली होती. या मुलीवर 65 वर्षांच्या नराधमाने अत्याचार केले होते. त्याने या लहान मुलीला गाईचे वासरु दाखवतो असे सांगून गोठ्यात नेले होते आणि तिथे तिच्यावर अत्याचार (Rape news) केले होते. यानंतर त्याने या मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह शेणात लपवून ठेवला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. मुलीचे कुटुंबीय आणि नसरापूरच्या ग्रामस्थांनी या प्रकरणातील आरोपीला तातडीने शिक्षा होईपर्यंत मुलीवर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. नसरापूरच्या ग्रामस्थांनी मुलीचा मृतदेह घेऊन पुण्यातील नवले पूलावर ठिय्या मांडला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जोपर्यंत आम्हाला येऊन भेटत नाहीत, तोपर्यंत आम्ही माघार  घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. या सगळ्यामुळे राज्यभरात नसरापूर प्रकरणाची चर्चा सुरु झाली होती. (Nasrapur Rape Case)

या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास आणि खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी सध्या पोलिसांकडून सध्या युद्धपातळीवर पुराव्यांची जुळवाजुळव करण्याचे काम सुरु असून लवकरच आरोपपत्र दाखल होऊन न्यायालयात खटला सुरु होईल. त्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून विशेष सरकारी वकील म्हणून तीन जणांच्या नावांची शिफारस सरकारला करण्यात आली आहे. या प्रकरणासाठी सुरुवातीला अ‍ॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती होईल, अशी चर्चा होती. मात्र, नसरापूर प्रकरणात  अ‍ॅडव्होकेट अजय मिसर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. आज संध्याकाळपर्यंत सरकारी वकीलांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.

Parole and furlough: लैंगिक अत्याचारातील आरोपींना पॅरोल रजा न देण्याची भूमिका योग्य: अनिकेत निकम

लैंगिक अत्याचारापासून आरोपींची मानसिकता ही निर्ढावलेली असते. या आरोपींना शिक्षा झाल्यानंतर फर्लो आणि पेरोल या दोन गोष्टीची मुभा असते. मात्र, विकृतीतून पून्हा हे गुन्हे त्यांच्याकडून होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. सरकारने अशा गुन्ह्यांतील आरोपींबाबत पॅरोल रजा ही मिळू नये यासाठी उचलेलं पाऊल हे नक्कीच अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी परिणामकारक ठरू शकत. शिवाय अशा आरोपींच्या जेल वर्तवणूक पाहता जेल प्रशासनाकडून ही अशा रजांना विरोध करता येऊ शकतो, अशी प्रतिक्रिया वकील अनिकेत निकम यांनी दिली.

Nasrapur case Post Mortem Report: नसरापूर प्रकरणातील मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय?

नसरापूरमधील पिडीतेच्या शवविच्छेदन अहवालात अनेक हादरवणाऱ्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. या अहवालात नमूद केल्याप्रमाणे मुलीच्या तोंडात मोजा कोंबण्यात आला होता. लैंगिक अत्याचार करून तिचा खून करताना आरोपीने मुलीच्या तोंडात पाय मोजा कोंबल्याचे तसेच छातीवर ओरखडे आणि व्रण उमटले असल्याचे शवविच्छेदन करताना निदर्शनास आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

admin
Author: admin

और पढ़ें