Search
Close this search box.

कमी पगार देणाऱ्या कंपनीवर कर्मचाऱ्याचा संताप; गोदामच पेटवलं, 1440 कोटी स्वाहा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल आणि कोणता विषय चर्चेत येईल याचा काहीच नेम नसतो. अशा या सोशल मीडियावर संपूर्ण जगाचं लक्ष वेधणारा एक व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी चर्चेत आला होता. ज्यामध्ये आगीचे प्रचंड लोट आणि एका मोठ्या क्षेत्रातून आगीमुळं येणारा धूर असं चित्र पाहायला मिळालं होतं. ही आग नेमकी कशामुळं लागली? कंपनीच्या कर्मचाऱ्याचा आणि पगाराचा काय फायदा? या सर्वच प्रश्नांची उत्तरं आता तपासातून समोर आली आहेत.

कुठं लागलेली ही भीषण आग? 

कॅलिफोर्नियास्थित ओंटारिओ इथं असणाऱ्या एका प्रचंड मोठ्या गोदामाला ही आग लागली होती. या भीषण अग्निकांडामध्ये तब्बल 1440 कोटी म्हणजेच ($170 Million+) इतकं नुकसान झालं होतं. मुळात ही आग लागली नव्हती, तर ती लावण्यात आली होती. कंपनीच्याच एका कर्मचाऱ्यानं ही आग लावली, ज्याचं नाव अब्दुल करीम असल्याचं म्हटलं जात आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या कर्मचाऱ्याची ओळख पटवून त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे.

लोकप्रिय स्पोर्ट्स ब्रँडच्या गोदामाला लागलेली आग 

ASICS या लोकप्रिय स्पोर्ट्स ब्रँडला ही आग लावण्यात आली होती. जिथं एके रात्री अचानक आग भडकण्यास सुरुवात झाली आणि पाहता पाहता ती इतक्या मोठ्या क्षेत्रात पसरली की संपूर्ण गोदाम भस्मसात झालं. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाची अनेक वाहनं घटनास्थळी दाखल झाली आणि तब्बल 10 ते 12 तासांच्या मेहनतीनंतर आग विझवण्यात यश मिळालं. मात्र तोपर्यंत गोदामाचीच राखरांगोळी झाली होती. या गोदामात कोट्यवधींचं सामान ठेवण्यात आलं होतं. अनेक प्रकारचे बुट इथं होते. मुळात आगीचं स्वरुपच 6 लाख चौरसफुटांवरील या गोदामाला गिळून गेलं.

एका व्हिडीओमुळं झाला खुलासा… 

गार्डियनच्या माहितीनुसार सोशल मीडियावरील एका व्हिडीओमुळं या आगीमागचं नेमकं कारण समोर आलं. ज्यामध्ये एक व्यक्ती या गोदामाला आग लावताना दिसत आहे. एकामागून एक तो सर्व सामान पेटवून देताना दिसत आहे. तो काहीतरी पुटपुटत असल्याचंही या व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. पोलिसांना आगीची ही घटना सामान्य नसल्याचा संशल आला तेव्हा त्यांनी याबाबतचा तपास सरू केला आणि आरोपीला ताब्यात घेतलं.

पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार आग लावणारी व्यक्ती कंपनीचाच कर्मचारी असून, हा 29 वर्षीय कर्मचारी आग लागल्याच्या  दिवशी ड्युटीवर होता. घटनेनंतर तो काही काळासाठी कोणाच्याही संपर्कात नसल्यानं संशय आणखी बळावला होता. राहिला मुद्दा व्हायरल व्हिडीओमध्ये हा कर्मचारी नेमकं काय पुटपुटत आहे तर, आपल्याला मेहनतीप्रमाणं पैसे मिळत नसल्याचीच नाराजी तो व्यक्त करत असल्याचं कळतं. कमी पगारामुळं कर्मचाऱ्यानं संतापाच्या भरात ही आग लावल्याचं म्हटलं जात आहे. गोदामात मोठ्या प्रमाणात कागद आणि ज्वलनशील पदार्थ असल्यामुळं कमी वेळात आग संपूर्ण गोदामात पसरली. दरम्यान सदर घटनेमध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नसून, आगीच्या घटनेवेळी तिथं 20 कर्मचारी हजर होते ज्यांना तातडीनं गोदामाबाहेर काढण्यात आलं.

admin
Author: admin

और पढ़ें