Search
Close this search box.

Lungi Ngidi DC vs PBKS IPL 2026 : लाईव्ह मॅचमध्ये मोठा अपघात अन् अख्खं स्टेडियम सुन्न! सामना सोडून लुंगी एनगिडी थेट हॉस्पिटलमध्ये, मॅटर सिरियस, नेमकं काय घडलं?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आयपीएल 2026 चा 35 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान अरुण जेटली स्टेडियमवर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. दिल्लीचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी याला झेल घेण्याच्या प्रयत्नात गंभीर दुखापत झाली असून त्याला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मैदानावर नेमकं काय घडलं? (Lungi Ngidi Injury Update) 

पंजाबचा फलंदाज प्रियांश आर्यने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत असताना मिड-ऑफला उभा असलेल्या लुंगी एनगिडीने झेल घेण्यासाठी धाव घेतली. मात्र, धावताना त्याचा अंदाज चुकला आणि तो पाठीवर जोरात पडला. दुर्दैवाने, पडताना त्याचे डोके जमिनीवर जोरात आदळले. पडल्यानंतर एन्गिडीला प्रचंड वेदना होत होत्या आणि तो बराच वेळ मैदानावर पडून होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने स्ट्रेचर आणि रुग्णवाहिका मैदानावर बोलावण्यात आली.

रुग्णालयात हलवले (Lungi Ngidi Hospital DC vs PBKS IPL 2026)

दिल्लीचे प्रशिक्षक हेमंग बदानी यांनी मानेच्या पट्ट्याची (Neck Brace) मागणी केली. लुंगी एनगिडीचा दक्षिण आफ्रिकी सहकारी डेव्हिड मिलर अत्यंत चिंतेत दिसत होता. सुदैवाने, लुंगी एनगिडी वैद्यकीय पथकाशी बोलत होता आणि प्रतिसाद देत होता. त्याला स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेत नेण्यात आले असून पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इम्पॅक्ट प्लेयर म्हणून चमीरा मैदानात 

लुंगी एनगिडी जखमी झाल्यामुळे श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंता चमीरा याला ‘इम्पॅक्ट खेळाडू’ म्हणून मैदानात उतरवण्यात आले आहे. त्याने एन्गिडीची जागा घेतली असून खेळ पुन्हा सुरू झाला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें