जागतिक बाजारातील अनिश्चिततेचा परिणाम देशातील सराफा बाजारावर दिसून येत असून 25 एप्रिल रोजी सोने-चांदीच्या (Gold-Silver Price) किमतींमध्ये हलकी वाढ नोंदवली गेली आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेत असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे कल वाढताना दिसत आहे.(Gold-Silver Price)
मागील व्यवहार सत्रात मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने-चांदी तेजीसह बंद झाले होते. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही (Comex) किमतींमध्ये सौम्य वाढ दिसून आली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क झाले असून गेल्या काही दिवसांपासून या सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत.(Gold-Silver Price)
Gold Silver Price: दरात सौम्य वाढ
ताज्या आकडेवारीनुसार, MCX वर मे डिलिव्हरीसाठी चांदीच्या दरात 1.38 टक्क्यांची वाढ होऊन ती 2,44,845 रुपये प्रति किलोवर पोहोचली. तर सोनेही 0.70 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात Comex वर सोने 4,725.40 डॉलर प्रति औंस दराने व्यवहार करत असून चांदी 0.24 टक्क्यांच्या वाढीसह 75.685 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.
Gold Silver Price: चांदीचे दर
दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे 10 ग्रॅम चांदीचा दर 2,600 रुपये आहे. 100 ग्रॅम चांदीसाठी 26,000 रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम चांदीचा दर 2,700 रुपये आहे.
Gold Silver Price: आजचे सोने दर (प्रति 10 ग्रॅम)
दिल्ली
24 कॅरेट – 1,54,190 रुपये
22 कॅरेट – 1,41,350 रुपये
18 कॅरेट – 1,15,680 रुपये
मुंबई
24 कॅरेट – 1,54,040 रुपये
22 कॅरेट – 1,41,200 रुपये
18 कॅरेट – 1,15,530 रुपये
चेन्नई
24 कॅरेट – 1,54,910 रुपये
22 कॅरेट – 1,42,000 रुपये
18 कॅरेट – 1,18,500 रुपये
कोलकाता
24 कॅरेट – 1,54,040 रुपये
22 कॅरेट – 1,41,200 रुपये
18 कॅरेट – 1,15,530 रुपये
अहमदाबाद
24 कॅरेट – 1,54,090 रुपये
22 कॅरेट – 1,41,250 रुपये
18 कॅरेट – 1,15,580 रुपये
लखनऊ
24 कॅरेट – 1,54,190 रुपये
22 कॅरेट – 1,41,350 रुपये
18 कॅरेट – 1,15,680 रुपये
पटना
24 कॅरेट – 1,54,090 रुपये
22 कॅरेट – 1,41,250 रुपये
18 कॅरेट – 1,15,580 रुपये
हैदराबाद
24 कॅरेट – 1,54,040 रुपये
22 कॅरेट – 1,41,200 रुपये
18 कॅरेट – 1,15,530 रुपये
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरमधील चढ-उतार आणि भू-राजकीय तणाव यावर सोने-चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी खरेदीपूर्वी बाजारातील स्थितीचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे.
Gold-Silver Price Today:22 आणि 24 कॅरेट सोनं म्हणजे नेमकं काय?
वजन मोजण्यासाठी किलो हे एकक आहे. पाणी मोजण्यासाठी लीटर या एककाचा वापर केला जातो. त्याच पद्धतीने सोन्याची शुद्धता मोजायची असेल तर कॅरेट या एककाचा वापर केला जातो. जेव्हे कॅरेट जास्त तेवढेच सोने शुद्ध असे मानले जाते. 24 कॅरेट सोने हे सर्वांत शुद्ध असल्याचे बोलले जाते. 24 कॅरेट सोनेच्या शुद्धता ही 99.9 टक्के असते. त्यामुळे या सोन्याचा भावही इतर सोन्याच्या तुलनेत अधिक असतो. 24, 22, 18, 14 अशा वेगवेगळ्या प्रकारचे सोने असते. 24 कॅरेट सोने वगळता इतर सर्व प्रकारच्या सोन्यात तांबे, चांदी असे इतर धातू मिसळले जातात. सोन्याच्या आभूषणांना मजबुती यावी म्हणून हे धातू सोन्यात मिसळले जातात. सोन्याची गुववत्ता ही बीआयएस या संस्थेतर्फे ठरली जाते. त्यामुळे हॉलमार्क असलेले सोनेच खरेदी करायला हवे, असा सल्ला दिला जातो.
Gold-Silver Price Today:गुंतवणुकीसाठी कोणतं सोनं योग्य आहे?
पैशांची गुंतवणूक करायची असलेल तर अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सोने जेवढे शुद्ध असेल भविष्यात तुम्हाला तेवढेच जास्त पैसे मिळतील. याच कारणामुळे 24 कॅरेट सोन्याचा भाव आज दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यातही 24 कॅरेट सोन्याचा दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशांच्या गुंतवणुकीसाठी 24 कॅरेट सोने हा सर्वोत्तम पर्याय आहे. पैशांच्या गुंतवणुकीसाठी 22 कॅरेट सोने हा पर्यायदेखील चांगला आहे.
Gold-Silver Price Today: दागिन्यांसाठी कोणते सोने योग्य आहे?
सोन्याचे आभूषणं करायची असतील तर ते 24 कॅरेट सोन्यापासून तयार करता येत नाहीत. कारण 24 कॅरेट सोने हे फार नरम असते. ते लगेच तुटते. त्यामुळेच 22 कॅरेट किंवा त्यापेक्षा कमी कॅरेटच्या सोन्यापासून आभूषणं तयार करता येऊ शकतात. अशा सोन्यात तांबे, चांदी अशा प्रकारचे धातू मिसळले जातात.








