Search
Close this search box.

Dharashiv News: धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकला कर्मचारी; दोन तासांच्या थरारानंतर सुटका

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

धाराशिव जिल्हा परिषदेच्या लिफ्टमध्ये एक व्यक्ती अडकल्याची घटना घडली आहे. लिफ्ट अचानक बंद पडल्याने एक व्यक्ती गेली दोन तासापासून लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली आहे.जिल्हा परिषद कर्मचारी आणि सुरक्षारक्षकाची चावीसाठी धावपळ केली. सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ लिपिक प्रदीप कुलकर्णी असं या लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. तब्बल 2 तासानंतर कर्मचाऱ्याला जिल्हा परिषदेच्या लिफ्टमधून सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांनी बाहेर काढलं. प्रदीप कुलकर्णी यांची लिफ्ट म्हणून सुटका झाली असली तरी अशा घटना वारंवारपणे घडत असल्याने लिफ्ट धोकादायक बनली आहे. नवीन अध्यक्षांनी सातत्याने बंद पडणाऱ्या लिफ्ट कडे लक्ष देण्याची सामन्यातून मागणी होत आहे. या घटनेनंतर परिसरात काही वेळ खळबळ उडाली होती, अखेर दोन तासानंतर कर्मचाऱ्याला बाहेर काढण्यात यश आलं

admin
Author: admin

और पढ़ें