Search
Close this search box.

Mumbai Goregaon Crime: मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 मुंबईच्या गोरेगाव (Goregaon News) पूर्व मधील दिंडोशी संतोष नगर (Dindoshi Santosh Nagar) परिसरामध्ये दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहेया घटनेतील दंगेखोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहेमुंबई महानगर पालिकेच्या (BMC) वतीने दिंडोशी संतोष नगर परिसराती दंगेखोरांच्या (Rioters) अनधिकृत घरांवर जेसीबीच्या (JCB) माध्यमातून तोडक कारवाई करण्यात येत आहेहि घरं अनधिकृत असल्याची तक्रार पालिका प्रशानाला प्राप्त झाल्यानंतर हि कारवाई करण्यात येत असल्याचे बोललं जात आहेयावेळी महापालिकेचे अधिकारीकर्मचारी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहेसध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

Goregaon Rioters : दंगेखोरांच्या अनधिकृत घरांवर जेसीबीच्या माध्यमातून तोडक कारवाई

दरम्यान, दिंडोशी संतोष नगर परिसरात मरियम्मा देवीचा शोभायात्रा दरम्यान, काल (5 एप्रिलसंध्याकाळच्या सुमारास राडा झाला. दोन गटात झालेल्या या वादानंतर तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीत तिन ते चार जण गंभीर तर अनेक लोक जखमी झाल्याची माहिती आहे.  दरम्यान, या प्रकरणी 8 जणांना दिंडोशी पोलिसांनी मध्यरात्री अटक केलीय. संतोष नगर परिसरातील ज्योती बार अँड रेस्टॉरंट जवळ हा प्रकार घडल्याची माहिती आहे. अशातच आता हल्ला करणाऱ्या आरोपींच्या अनाधिकृत घरावर बुल्डोजर चालवला जात आहे.

Mumbai Goregaon News : फक्त दाखवण्यासाठी कारवाई होत असेल तर पुन्हा आंदोलनावर बसणार

दुसरीकडे दिंडोशी संतोष नगर परिसरात जेसीबी कारवाईच्या ठिकाणी बजरंग दलाचा कार्यकर्ता दाखल झाले आहेत. बजरंग दलाचा कार्यकर्तांकडून काल पोलीस आणि बीएमसीकडे मागणी करण्यात आली होती, कि ज्या आरोपीने मरियम्मा माता यांच्या शोभायात्रेवर हल्ला केला त्यांच्या अनधिकृत दुकान आणि घरांवर कारवाई करण्या यावी. यानंतर आज पालिकेकडून जेसीबीच्या माध्यमातून तोडक कारवाई करण्यात आली. काल संध्याकाळी मरियमा मातेची शोभायात्रा या परिसरात काढण्यात आली होती. या शोभायात्रामध्ये राम यांचं जोरात गाणं वाजत असल्यामुळे दुसरा गटाकडून विरोध करण्यात आला. यानंतर दुसरा गटाकडून हिंदू शोभायात्रेमध्ये तलवार, लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आला. यामध्ये बजरंग दलाचे तीन कार्यकर्ता गंभीर जखमी झाले आहे. सर्वांवर जोगेश्वरी ट्रामा केअर रुग्णालयमध्ये उपचार सुरू आहेअशी माहिती बजरंग दल कोकण प्रांतचे सहसंयोजक गौतम रावारीया यांनी दिलीयतर हि फक्त दाखवण्यासाठी कारवाई होत असेल तर पुन्हा आंदोलनावर बसणार असल्याचा इशारा बजरंग दलाचा कार्यकर्त्यांनी यांनी दिली आहे.

Sunil Prabhu : कारवाई योग्य, आमदार सुनिल प्रभू यांची प्रतिक्रिया

दरम्यान याच मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी प्रतिक्रिया देत हि कारवाई योग्य असल्याचे सांगितलंदोषींवर कारवाई केली जाईल असेही ते म्हणालेतर दिंडोशी संतोष नगर परिसरामध्ये काल पोलिसांनी दंगल घडवली, असा आरोप बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी केला आहे. बजरंग दलाचे कार्यकर्ता आणि पोलिसांमध्ये तुफान बाचाबाची झालीयावेळी कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी शोभायात्रामध्ये हल्ला झाला होता त्याच ठिकाणी सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यावरून आक्रमक झाले. मात्र पोलीस त्यांना हनुमान चालीसा पठण बाहेर करा, त्या ठिकाणी पुन्हा कायदा सुव्यवस्था खराब होण्याची शक्यता आहे, अशी समजूत घालत आहे. मात्र बजरंग दलाचा कार्यकर्ता आपल्या निर्णयावर अटळ असून परिणामी पोलिसांमध्ये तुफान गोंधळ सुरू आहे.

admin
Author: admin

और पढ़ें