Search
Close this search box.

Ram Navami 2026 : सूर्यकिरणं रामाच्या कपाळी…अयोध्येत आज राम जन्मोत्सव सोहळा, दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

काल म्हणजेच 26 मार्च 2026 रोजी देशभरात रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला.मात्र, प्रभू श्रीरामाच्या अयोध्यानगरीत गेल्या तीन दिवसांपासून राम जन्मोत्सव सोहळा पार पडतोय.त्यानुसार, अयोध्येच्या राम मंदिरात आज सूर्यतिलक सोहळा हा मुख्य सोहळा पार पडतोय.विज्ञान आणि परंपरा यांचा अनोखा संगम आपल्याला अयोध्या नगरीत पाहायला मिळतोय.या ठिकाणी सूर्याची किरणं बरोबर रामाच्या कपाळी पडताना दिसतायत. जवळपास 4 मिनिटं आपण हा सोहळा अनुभवू शकतो. ही सूर्यकिरणं थेट श्रीरामाच्या कपाळी आपण पाहणार आहोत. हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी आज देशभरातली भक्त जमा झाले आहेत. अयोध्यानगरीत भक्तांची मोठी मांदियाळी पाहायला मिळतेय.मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. जवळपास तीन दिवस राम जन्मोत्सवाचा हा उत्सव साजरा करण्यात येतोय.सूर्यतिलकाच्या या प्रणालीमध्ये बेंगळुरु येथील ऑप्टिका इन्स्टिट्यूट आणि भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या आरसी आणि भिंग वापरले जातात. या ऐतिहासिक क्षणी रामलल्लाची पूजा, अभिषेक आणि आरतीही केली जाते.

admin
Author: admin

और पढ़ें