Search
Close this search box.

जन्मदात्या बापाचा सैतानी अवतार! शेजारच्या घरात चोरीच्या संशयावरून दोन लेकींना रात्रभर उलटं टांगलं; 10 वर्षीय चिमुरडीचा पाणी पाणी करत तडफडून जीव गेला, नातीसाठी धावलेल्या आजोबावर कोयत्याने हल्ला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 सांगली जिल्ह्यातील बनपुरी (ता. आटपाडी) येथे एका निर्दयी बापाने पोटच्या दोन लहान मुलींचा अमानुष छळ केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. केवळ चोरीच्या संशयावरून बापाने दिलेल्या क्रूर शिक्षेमुळे 10 वर्षीय सानिकाचा मृत्यू झाला असून, दुसरी मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. नाना हैबत यमगर या नराधम बापाने शेजारच्या घरात चोरी केल्याच्या केवळ संशयावरून आपल्या 10 वर्षीय सानिका आणि 11 वर्षीय अनुजा या दोन मुलींना अमानुष शिक्षा देण्याचे ठरवले. बुधवारी सायंकाळी 5 वाजता त्याने दोन्ही मुलींचे हात-पाय बांधले आणि त्यांना घरातील पत्र्याच्या अँगलला ‘उलटे’ टांगून ठेवले.

रात्रभर पाणी.. पाणी.. म्हणून ओरडत होत्या लेकी

या दोन्ही निष्पाप मुली रात्रभर वेदनेने तडफडत होत्या. त्या आपल्या आई-वडिलांकडे ‘पाणी.. पाणी..’ म्हणून आक्रोश करत होत्या. मात्र, या निष्ठूर आई-वडिलांना त्यांची साधी दयाही आली नाही.धक्कादायक बाब म्हणजे, पोटच्या पोरी वर टांगलेल्या असताना हे आई-वडील त्यांच्या खालीच निर्धास्तपणे झोपले होते. रात्रभर झालेल्या या छळामुळे सानिकाचा जागीच मृत्यू झाला, तर अनुजा गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडली.

आजोबांवर जीवघेणा हल्ला आणि गुपचूप अंत्यसंस्काराचा घाट

गुरुवारी सकाळी सहा वाजता मुलींच्या आजोबांनी त्यांना खाली उतरवले. मात्र, मुलींना खाली का सोडले, या रागातून नराधम बापाने स्वतःच्या पित्यावरच (आजोबांवर) कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. सानिकाचा मृत्यू झाल्याचे समजताच, हे भयंकर कृत्य लपवण्यासाठी आई-वडील आणि काही नातेवाईकांनी मिळून सानिकाच्या मृतदेहावर गुपचूप अंत्यसंस्कार उरकण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून पोलिसांना याचा सुगावा लागणार नाही.

बेशुद्ध अनुजा शुद्धीवर आली आणि सत्य बाहेर आले

या प्रकरणाचा भांडाफोड गंभीर जखमी असलेल्या अनुजामुळे झाला. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना अनुजा शुद्धीवर आली. तिने डॉक्टरांना बापाने दिलेल्या अमानुष वागणुकीचा आणि सानिकाच्या मृत्यूचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. हे ऐकून डॉक्टरही सुन्न झाले. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले आणि या सैतानी कृत्याचा पर्दाफाश झाला.

admin
Author: admin

और पढ़ें