Search
Close this search box.

डॉलरच्या तुलनेत रुपया पडला, पहिल्यांदाच 94 वर; तुमच्यावर काय, कसा परिणाम होणार?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 पश्चिम आशियामध्ये इस्रायल आणि इराणदरम्यान सुरु असलेलं युद्ध आणि संघर्षामुळे तणवाची स्थिती निर्माण झाली आहे. याच तणावाचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेलाही बसताना दिसतोय. परिणामी भारतीय चनलाचं अवमूल्यन झालं असून रुपयाने पहिल्यांदाच 94 चा टप्पा गाठला आहे. 94 चा टप्पा ओलांडल्यानंतर दिवसाअखेर रुपया 95.53 वर बंद झाला. मात्र रुपया पडल्याने नेमका काय परिणाम होणार? असा अचानक रुपया पडण्यामागील कारणं कोणती? यासंदर्भात भारतीय बँकांची बँक आणि देशातील सर्वात मोठी वित्तीय संस्था असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयचं काय म्हणणं आहे? या साऱ्या प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

घसरणीचा परिणाम काय होणार?

परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून सतत काढत असलेले पैसे आणि भारतीय शेअर बाजारात झालेली घसरण यामुळे रुपयाने डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांक गाठला. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने आयात महाग होणार. याचा थेट परिणाम महागाई होणार असून आगामी काळात महागाई वाढणार याचेच हे संकेत आहेत. आयातीसाठी अधिक पैसे खर्च करावे लागणार असून भारताला प्रमुख्याने तेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यतेलासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. यासाठी भारताची परदेशी गंगाजळी खर्च होणार आहे.

 

साध्या भाषेत सांगायचं तर, डॉलरची मागणी वाढते आणि रुपयाची पुरवठा जास्त राहतो म्हणून रुपया कमकुवत होतो. युद्धजन्य परिस्थितीमध्ये डॉलरची जगभरात मागणी वाढते. यामागील प्रमुख कारण म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये डॉलर हे सर्वात सुरक्षित चलन मानलं जातं. म्हणूनच लोक इतर बाजारपेठांमध्ये गुंतवलेले पैसे काढून डॉलरमध्ये गुंतवणूक करतात. याचा फायदा डॉलरची किंमत वाढण्यासाठी होतो. रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाला तर परदेशी प्रवास आणि शॉपिंग महाग होते. डॉलर महाग झाल्यास निर्यात करणाऱ्या कंपन्यांना फायदा होतो. मात्र भारताची आयात ही निर्यातीपेक्षा अनेक पटींनी अधिक असल्याने निर्यातदार कंपन्यांना होणारा फायदा हा रुपयाचं मूल्य सावरुन धरण्यासाठी पुरेसा नसतो.

रुपया घसरणीची प्रमुख 4 कारणे

जागतिक गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलरकडे वळले आहेत. त्यामुळेच लोक भारतीय बाजारपेठांमधून पैसे काढून घेत असून डॉलर्समध्ये गुंतवणूक करत आहेत. याच कारणाने डॉलर अधिक मजबूत आणि रुपया कमकुवत झाला आहे.

विदेशी गुंतवणूकदारांनी भारताकडे पाठ फिरवल्याचा फटका थेट रुपयाच्या मूल्याला बसला आहे.

भारताचा परकीय चलन साठा घटून 709.75 अब्ज डॉलरवर आला आहे. त्यातच आता आयात महागणार असल्याने परदेशी व्यवहार करताना तेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि खाद्यतेलासाठी हेच परकीय चलन अधिक खर्च करावं लागणार असून त्यात अधिक घट होणार आहे.

डॉलरचा निर्देशांक वाढल्याचा परिणाम रुपयावर झाला असून रुपयाचं अवमूल्यन होण्यासाठी हे ही एक महत्त्वाचं कारण आहे.

भारत कच्चे तेल, सोने, इलेक्ट्रॉनिक्स सर्वाधिक प्रमाणात आयात करतो. मात्र तितक्या प्रमाणात भारताची निर्णयात नाही. भारत आपल्या गरजेपैकी 80 टक्के कच्चे तेल आयात करतो. भारतात परदेशातून होणारी सोन्याची आयातही वाढली आहे. यामुळे डॉलरची मागणी वाढते आणि रुपया पडतो.

इराण-इस्रायल युद्धामुळे केवळ तेलच नाही तर धातूंच्या किंमतींमध्येही वाढ झाली आहे. सोने-धातूंच्या किंमती वाढल्या असून भारत आयात-निर्भर असल्याने या धातूच्या किंमतींमध्ये थोडी वाढ झाली तरी त्याचा थेट परिणाम रुपयाच्या किंमतीवर जाणवतो. तसेच भारतात महागाई अमेरिकेपेक्षा जास्त असते, त्यामुळे रुपयाची खरेदी क्षमता कमी होते.

आरबीआयचा इशारा

रिझर्व्ह बँकेनेही या पार्श्वभूमीवर काही सल्ले दिले आहेत. युद्धामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये अस्थिरता वाढली असून, भारताने याचे संभाव्य परिणाम टाळण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याची गरज असल्याचा इशारा रिझर्व्ह बँकेने दिला आहे. आरबीआयच्या बुलेटिनमध्ये कच्च्या तेलासाठी आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या भारतासाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरू शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. भारताची अर्थव्यवस्था सध्या मजबूत स्थितीत आहे.
मजबूत आर्थिक वाढ, स्थिर व्यापक आर्थिक निर्देशक आणि बाह्य क्षेत्रातील सक्षम स्थिती यामुळे भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत असून या आर्थिक परिस्थितीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेमधील हलचालींमुळे बसणारे नकारात्मक धक्के सहन करण्यासाठी सक्षम असल्याचंही आरबीआयने म्हटलं आहे.

admin
Author: admin

और पढ़ें