अहिल्यानगरमध्ये सहावीत शिकणा-या मुलीवर अॅसिड हल्ला करण्यात आला. शाळा सुटल्यानंतर घरी जाणा-या मुलीसमोर अचानक येऊन, अज्ञात तरुणानं तिच्या चेहे-यावर ऍसिड फेकलं. मुलीनं आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांनी धाव घेतली. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील मुलीला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. हल्ल्याचं नेमकं कारण समजलेलं नाही. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे.
प्रकार अतिशय निंदनीय – आदिती तटकरे
अहिल्यानगर परिसरात सहावीच्या विद्यार्थिनीवर झालेल्या अॅसिड हल्ल्यावर महिला व बालविकार मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा प्रकार निंदनीय असल्याच म्हटलं आहे. स्थानिक प्रशासन देखील तिथे आहे . लोणीमध्ये त्या मुलीवर उपचार सुरु आहेत. मुलगी घाबरलेली आहे . प्राथमिक माहितीनुसार, ॲसिड फेकत कृत्य केलं आहे. सीसीटीव्हीची माहिती अद्याप आढळलेली नाही. पोलीस स्थानिक प्रशासनाला निर्देश दिलेत, अधिकाधिक माहिती घ्यावी. कुटुंबासोबत बोलून माहिती घेऊन अद्याप माहिती घेतली नाही आहे. आमची मनोधैर्य योजना आहे त्यातून आर्थिक सहाय्य देण्याची प्रस्तावाची मागणी केली आहे.









