Search
Close this search box.

शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अतानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच देशातील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या युपीएससी (UPSC) परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील तरुणाईने स्वत:ला सिद्ध केलं आहे. परिस्थितीशी दोन हात करत, संकटांवर मात करत काहींनी देदीप्यमान यश मिळवलं. त्यामध्ये, जालना (Jalna) जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या जळगाव सपकाळ येथे राहणाऱ्या एका मजुराच्या मुलाने UPSC परीक्षेत उतीर्ण होत IPS पदाला (IPS) गवसणी घातली. गतवर्षी युपीएससीचा निकाल लागल्यानंतर कोल्हापुरातील मेंढपाळाच्या मुलाने युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होत IPS बनण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. यंदा जालन्यातली भिजन रोजेकरनेही अशीच किमया करुन दाखवलीय.

भोकरदन येथील 26 वर्षाच्या भिकन रोजेकर याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये 812 वा रँक घेऊन अतिशय कष्टातून शिकवणाऱ्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केलंय. या स्वप्नपूर्तीनंतर, भिकनच्या या यशामुळे तो राहत असलेल्या त्याच्या पत्र्याच्या शेडमधील घरात मोठा आनंद उत्सव पाहायला मिळतोय. माणसांचा राबता, शाल, फुले, बुके आणि अभिनंदनाचा वर्षाव या पत्र्याच्या शेडमध्ये दिसून येत आहे. भिकनचे प्राथमिक शिक्षण हे गावातच झाले असून महाविद्यालयिन शिक्षणासाठी त्याने छत्रपती संभाजीनगर गाठलं. त्यानंतर, घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे एका एनजीओच्या माध्यमातून त्यांने दिल्ली येथे राहून यूपीएससीचा अभ्यास केला. युपीएससीच्या परीक्षेत त्याला अनेकवेळा अपयश आले. मात्र, सहाव्या प्रयत्नात त्याने अखेर हे यश संपादन करत स्वत:ची आणि आई-वडिलांची स्वप्नपूर्ती केली. भिकनचे वडील जगन रोजेकर यांनी दुसऱ्याच्या शेतात राबून भिकनच्या शिक्षणाला पाठबळ दिलं, लेकाच्या शिक्षणासाठीचा खर्च पूर्ण केला.

आई-वडिलांना अत्यानंद

आई-वडिलांचे अपार कष्टानेच आपल्याला प्रेरित केलं. त्यासोबतच, मित्र आणि नातेवाईकांनीही आपल्याला साथ दिल्यामुळे आपण हे यश मिळवल्याचं भिकनने माध्यमांशी बोलातना म्हटलं. दुसरीकडे, आपल्या लेकाच्या खांद्यावर आता खाकी वर्दी येणार, लेक आयपीएस अधिकारी होणार असल्याने, मुलाच्या शिक्षणासाठी आयुष्य कष्टात घालवलेल्या त्याच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झालाय.

admin
Author: admin

और पढ़ें