Search
Close this search box.

Tushar Damgude : काल जे काही केलं त्याच्याबद्दल मला अभिमान आहे, जे केलं ते योग्यच होतं, कोणतीही खंत नाही: तुषार दामगुडे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी मला पूर्वी धमकी दिली होती. एका टीव्ही चॅनलवरील डिबेट शोदरम्यान त्यांनी मला जातिवाचक शिवीगाळ केली होती. अशा प्रकारची प्रवृत्ती काल पुन्हा माझ्यासमोर आली, तेव्हा मी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले, असे हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यानं म्हटलं आहे. मी जे केले ते योग्यच केले, असे मला वाटते. या प्रकारच्या  लोकांना कधी कधी ठाम आणि स्पष्ट शब्दांतच उत्तर द्यावे लागते. त्या ठिकाणी जे काही घडले, त्याबद्दल मला कोणतीही खंत नाही, असंही तुषार दामगुडे म्हणाला.

हनुमंत पवार ज्या विचारसरणीतून येतात, त्या पार्श्वभूमीवर त्यांना ठोस प्रत्युत्तर देणे गरजेचे होते. काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात देशात अनेक गंभीर घटना घडल्या आहेत, याचीही नोंद घ्यायला हवी. डिबेटदरम्यान हनुमंत पवार यांनी मला उद्देशून “तू पिशव्यांची पैदास आहेस, तू नाना फडणीस यांची पैदास आहेस; मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे,” अशा स्वरूपाचे वक्तव्य केले होते, असा दावा तुषार दामगुडेनी केला.

माझ्याकडे कायदेशीर परवान्यासह बंदूक आहे. मी अनेक नक्षलवादी भागांमध्ये काम करतो, आणि त्या अनुषंगाने स्वतःच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती साधने बाळगणे मला गरजेचे वाटते. पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस योग्य ते तपास करतील. पोलिसांनी मला माझं शस्त्र मागितलं मी ते त्यांना सोपवलं आहे, असं तुषार दामगुडे म्हणाला.

हनुमंत पवार आज काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्यांनी आपल्या मातृसंघटनेच्या संस्कारांना जागून गृहमंत्रिपदाच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्याची खंत आहे, असं काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार म्हणाले.

आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आरोपींवर कठोर कारवाईची अपेक्षा ठेवत आहोत. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन नोटीस देत सोडून दिले, ही बाब गंभीर आहे. अशा प्रकरणांत कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी भूमिका हनुमंत पवार यांनी मांडली.

आमचा जीव गेल्यानंतर किंवा आमच्या कुटुंबीयांवर संकट आल्यानंतरच पोलीस कारवाई करणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.तसेच तुषार दामगुडेला परवानाधारक पिस्तूल स्वतःच्या संरक्षणासाठी देण्यात आले आहे की इतरांना दमदाटी करण्यासाठी, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी देखील हनुमंत पवार यांनी केली. काल घडलेल्या प्रकरणानंतर हनुमंत पवार आज पोलीस आयुक्तांची भेट घेणार होते.

admin
Author: admin

और पढ़ें