सरकारी जमिनीच्या कथित बेकायदेशीर व्यवहारप्रकरणी दिग्विजय पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. कोरेगाव पार्क मुंढवा येथील सुमारे 40 एकर शासकीय जमिनीची 300 कोटी रुपयांची विक्री दाखवून 6 कोटींच्या मुद्रांक शुल्काची चोरी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा अंतर्गत सरकारी मालकीच्या जमिनीची बेकायदेशीर विक्रीप्रकरणी दिग्विजय पाटील यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. या व्यवहारात सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद करत न्यायालयाने गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास नकार देण्यात आला.
त्यामुळे अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.








