Search
Close this search box.

उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याच्या दरात घसरण; आज स्वस्त झालं सोनं-चांदी, वाचा 10 ग्रॅमचा भाव

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठे उलटफेर दिसून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्याच्या दरात वाढ होत होती. मात्र आज सोन्याचे दर घसरले आहेत. आज 16 डिसेंबर रोजी सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवली आहे. डॉलरच्या किंमतीतील होणारी घसरण याचा परिणाम मौल्यवान धातुंवर झाला आहे.

16 डिसेंबरच्या सकाळी एमसीएक्सवर सोनं आणि चांदीच्या किंमती घसरल्या होत्या. स्पॉट डिमांडची कमी मागणी आणि प्रॉफिट बुकिंगमुळं हा परिणाम होताना दिसतोय. सकाळी साधारण 9.10 वाजता MCX वर सोन्याचा वायदा 0.48 टक्क्यांनी घटून 1,33,492 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होते. तर MCX चांदीचा वायदा 1.64 टक्क्यांनी घटून 1,94,657 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,520 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 1,33,860 रुपयांवर पोहोचलं आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,400 रुपयांनी घट झाली असून प्रतितोळा सोनं 1,22,700 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 1,150 रुपयांनी घसरले असून 1,00,390 रुपयांवर पोहोचले आहे.

चांदीचा दर

आज महाराष्ट्रात 10 ग्रॅम 1,991 रुपयांवर चांदी पोहोचली आहे. तर, 100 ग्रॅम चांदी 19,910 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर 1 किलो चांदी 1,99,100 रुपयांवर पोहोचली आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?
– 10 ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,22,700 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,33,860 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 1,00,390 रुपये

– 1 ग्रॅम सोनं किंमत

1 ग्रॅम 22 कॅरेट 12,270 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 13,386 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 10,039 रुपये

8 ग्रॅम सोनं किंमत

8 ग्रॅम 22 कॅरेट 98,160 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 1,07,088 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 80,312 रुपये

– मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर? (Today Gold Rate in Mumbai Pune)

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,22,700 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,33,860 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 1,00,390 रुपये

admin
Author: admin

और पढ़ें