Search
Close this search box.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात लक्षवेधी घडामोड! BMC निवडणुकांसाठी सोडत जाहीर; किरीट सोमय्या, तेजस्विनी घोसाळकर यांच्यासह अनेग दिग्गजांना धक्का

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई मनपा निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेतील एकूण सदस्यसंख्या 227 आहे. यापैकी महिलांसाठी 114 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी (SC) 15 प्रभाग आरक्षित आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी (ST) 2 प्रभाग आरक्षित आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) साठी 61 प्रभाग आरक्षित आहेत. सर्वसाधारण प्रभागांची संख्या 149 असून, त्यापैकी 74 महिलांसाठी राखीव आहेत. अनेक दिग्गजांना सोडतीचा जबरदस्त फटका बसणार आहे.

माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांना आरक्षण सोडतीचा फटका बसणार आहे. वार्ड क्रमांक एक ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित करण्यात आली आहे.  किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या यांचा वार्ड 108 ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे.  शरद पवार गटाच्या मुंबई महिला अध्यक्ष राखी जाधव यांचा वार्ड 131 महिला ओपन असा आरक्षित करण्यात आला आहे.  वरळीत ठाकरे गटाचे आशिष चेंबुरकर यांना धक्का बसला आहे.  आशिष चेंबूरकर यांचा वार्ड क्रमांक 196 महिला ओपनसाठी आरक्षित करण्यात आला आहे.

ठाकरेंच्या सेनेचे घाटकोपरचे विभागप्रमुख सुरेश पाटील यांना आरक्षणाचा फटका बसणार आहे.  सुरेश पाटील यांचा वार्ड क्रमांक 127 महिला ओपनसाठी आरक्षित करण्यात आला आहे.  ठाकरेंच्या सेनेच्या आणि मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर यांना देखील धक्का बसला आहे.  स्नेहल आंबेकर यांचा वार्ड क्रमांक 198 ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे.

माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि शिंदे गटाचे नेते यशवंत जाधव यांना धक्का बसला आहे.  यशवंत जाधव यांचा वार्ड क्रमांक 209 महिला ओपनसाठी आरक्षित करण्यात आला आहे.  यशवंत जाधव हे सलग चार वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले आहेत.  भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर, रवी राजा यांना देखील धक्का बसला आहे. मकरंद नार्वेकर यांचा वार्ड क्रमांक 227 महिला वर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे.  माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा वार्ड क्रमांक 173 ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें